राष्ट्रीय एकता दिनानिमित्त एक भारत श्रेष्ठ भारत या थीमवर आधारित केंद्रीय संचार ब्युरो कोल्हापूर यांच्या वतीने आयोजित सरदार वल्लभभाई पटेल यांच्या दुर्मिळ छायाचित्रांच्या प्रदर्शनाची दिमाखात सांगता….

मिरज- 2 नोव्हेंबर –

ष्ट्रीय एकता दिनानिमित्त माहिती व प्रसारण मंत्रालयाच्या अंतर्गत कार्यरत असलेल्या केंद्रीय संचार ब्यूरो, क्षेत्रीय कार्यालय कोल्हापूर आणि मध्य रेल्वे पुणे मंडल यांच्या संयुक्त विद्यमाने सरदार वल्लभभाई पटेल यांचा जीवनपट उलगडून दाखवणाऱ्या दुर्मिळ छायाचित्रांच्या विभागस्तरीय प्रदर्शनाची आज सांगता झाली.

या वेळी शाहीर अनंतकुमार साळुंखे आणि त्यांच्या कलापथकाने सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. यावेळी महिला आर्थिक विकास महामंडळाच्या विविध बचत गटांनी, रेल्वे रिक्षा संघटना प्रतिनिधींनी तसेच विविध युवक संघटनांनी प्रदर्शनाला भेट दिली आणि सरदार पटेल यांच्या जीवनाविषयी जाणून घेतले.  31 ऑक्टोबर या सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीचे औचित्य साधून महाराष्ट्राचे कामगार मंत्री सुरेश खाडे यांच्या हस्ते या प्रदर्शनाचे उद्‌घाटन झाले होते.

यावेळी आयोजित प्रश्नमंजुषेमध्ये बचत गटाच्या महिलांनी हिरीरीने सहभाग घेतला. स्पर्धेतील  विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले.

टपाल विभाग, रेल्वे चाइल्ड हेल्पलाइन तसेच जिल्हा निवडणूक कार्यालय यांच्या वतीने लावण्यात आलेल्या स्टॉल्सच्या प्रतिनिधींना देखील यावेळी गौरविण्यात आले.

सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जीवनावरील माहिती मल्टीमीडिया माध्यमातून प्रदर्शनावेळी देण्यात आली होती. भव्य कट आउट तसेच सेल्फी बूथ देखील प्रवाशांसाठी आकर्षणाचा विषय ठरले.

देशाच्या एकीकरणाचे शिल्पकार असलेल्या सरदार पटेल यांच्या जीवनाची सर्वसामान्यांना दुर्मिळ छायाचित्रांच्या माध्यमातून माहिती घेता यावी या उद्देशाने हे छायाचित्र प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. एक भारत श्रेष्ठ भारत योजनेनुसार या प्रदर्शनामध्ये महाराष्ट्राचे जोडीदार राज्य असलेल्या ओडिशा राज्याची माहिती, चित्र तसेच व्हिडिओच्या माध्यमातून या प्रदर्शनामध्ये देण्यात आली.

केंद्रीय संचार ब्युरो, प्रादेशिक कार्यालय पुणे यांच्या अंतर्गत कार्यरत असलेल्या कोल्हापूर सांगली आणि रत्नागिरी असे कार्यक्षेत्र असलेल्या केंद्रीय संचार ब्युरो, कोल्हापूर मार्फत आयोजित या प्रदर्शला प्रतिदिन 5 हजारापेक्षा जास्त लोकांनी भेट दिली. 

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!