मिशन कवचकुंडल मोहिमेत अधिकाधिक नागरिकांनी लसीकरण करुन घेण्याचे आवाहन मोहिमेच्या पहिल्या दिवशी 30 हजार नागरिकांचे लसीकरण

जालना

जालना जिल्ह्यात कोव्हीड19 चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी अधिकाधिक नागरिकांचे लसीकरण व्हावे यादृष्टीने मिशन कवचकुंडल अभियानाचा तिसरा टप्पा 25 ते 30 ऑक्टोबर दरम्यान राबविण्यात येत आहे. अभियानाच्या पहिल्या दिवशी 30 हजारापेक्षा अधिक नागरिकांचे लसीकरण करण्यात आले असुन या मोहिमेत जालना जिल्हा वासियांनी उस्त्फुर्तपणे सहभागी होत लसीकरण करुन घेण्याचे आवाहन जालना जिल्हा परिषदेच्यावतीने करण्यात आले आहे.

मिशन कवचकुंडल मोहिम यशस्वीरित्या राबविण्यात यावी, यासाठी जिल्हा परिषदेच्यावतीने मोहिमेचे काटेकोरपणे नियोजन करण्यात आले असुन 14 ते 24 ऑक्टोबर या कालावधीत प्रत्येक गावातील मतदान यादी उपलब्ध करुन घेत यादीनुसार ज्या नागरिकांचे लसीकरण झालेले नाही अशा नागरिकांची यादी करत त्यांची यादी अंतिम करण्यात आली आहे. लसीकरण राहिलेल्या नागरिकांची गल्ली, वॉर्डनिहाय याद्यांचे कर्मचार्‍यांमध्ये समभागात विभागणीही करण्यात येत या कर्मचार्‍यांमार्फत नागरिकांच्या घरोघरी जाऊन लसीकरणाचे महत्व पटवुन देण्यात आले आहे.

ग्रामीण भागामध्येही लसीकरणाबाबत सर्वदूर जनजागृती करण्यात आली असुन गावापासुन दूर राहत असलेल्या नागरिकांसाठी वाहनाची व्यवस्था करत नागरिकांना केंद्रापयर्ंत आणण्याची प्रक्रिया पार पाडण्यात आली असुन मोहिमेच्या पहिल्या दिवशी जवळपास 30 हजार नागरिकांचे लसीकरण करण्यात आले आहे.

18 वर्षावरील जे नागरिक लसीकरणापासुन अद्यापही वंचित असतील अशांनी आपल्या नजिकच्या लसीकरण केंद्रावर जाऊन लसीकरण करुन घेण्याचे आवाहनही जिल्हा परिषद, जालना यांच्या मार्फत करण्यात आले आहे.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!