यावल शहरात व तालुक्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दोन दिवसीय संचारबंदीला कडकडीत बंद पाळुन प्रतिसाद

यावल ( प्रतिनिधी ) तालुक्यात कोरोना विषाणु संसर्गाच्या पार्श्वभुमीवर शासनाने संपूर्ण राज्यात पुकारलेल्या शनिवार आणी रविवार या दोन दिवसांसाठी कडक निर्बंध लागू करण्यात आले असुन , या संचारबंदीला सर्वसामान्य नागरीकांसह व्यापारी यांनी आपले संपुर्ण व्यवसाय बंद ठेवुन कडकडीत बंद पाळला आहे . दरम्यान जळगाव जिल्ह्यासह यावल तालुक्यात देखील कोरोना विषाणु संसर्गा हा दुसऱ्या टप्यात अत्यंत वेगाने वाढत असून , सर्वत्र बाधीत रुग्णांची संख्या कमी होण्या एवजी सातत्याने वाढता दिसत असुन , ही बाब अत्यंत चिंताजनक असल्याने नागरीकांच्या आरोग्याच्या दृष्टीने राज्याशासनाने कोरोनाची साखळी तोडण्यासाठी शनिवार व रविवार या दिवसाकरीता अत्य आवश्यक सेवा वगळता सर्व दुकाने व व्यवसाय पुर्णपणे बंद ठेवण्याचे निर्णय घेत असुन , या दोन दिवसांच्या कडक निर्बंधला यावल शहर आणी तालुक्यात सर्व नागरीकांनी व व्यापारी मंडळीनी आपले व्यवसाय पुर्णपणे बंद केल्याने या दोन दिवसीय संचारबंदी चांगला प्रतिसाद मिळाला आहे . यासाठी पोलीस निरिक्षक सुधीर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरिक्षक जितेन्द्र खैरनार , पोलीस उपनिरिक्षक अजमल खान सर्व पोलीस कर्मचारी व गृहरक्षक दलाचे कर्मचारी तसेच नगर परिषदचे शिवानंद कानडे , स्वप्नील म्हस्के , विजय बडे , राजेन्द्र गायकवाड हे संचारबंदीच्या परिस्थिवर नजर ठेवुन आहे .

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!