समता परिषदेच्या जिल्हा उपाध्यक्ष पदी एम.पी.कोळी यांची निवड…

दैनिक महाराष्ट्र सारथी भडगाव प्रतिनिधी रणजीत सोनवणे सर यांचेकडून

जिल्हा निमंत्रक रणजीत सोनवणे, मनीषा देशमुख मनोज नन्नवरे या तिघ जिल्हा निमंत्रकांनी केलेल्या अवाहनाने 14 नोव्हेंबर रोजी रविवारी मेळावा आयोजित करण्यात आला.

✍🏻जळगाव -महाराष्ट्र राज्य समता शिक्षक परिषद जिल्हा शाखा जळगाव च्या वतीने जिल्हा मेळाव्याचे आयोजन सरदार वल्लभ भाई पटेल सभागृह जळगाव येथे जिल्हा निमंत्रक रणजीत सोनवणे, मनीषा देशमुख मनोज नन्नवरे या तिघ जिल्हा निमंत्रकांनी केलेल्या आव्हान नुसार मेळावा आयोजित करण्यात आला.

याप्रसंगी माध्यमिक विभागाच्या शिक्षणाधिकारी कल्पना चव्हाण, प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी विकास पाटील, डायटचे अधिव्याख्याता शैलेश पाटील, विस्तारअधिकारी रागिनी चव्हाण व शिक्षण विस्ताराधिकारी खलील शेख, जळगावचे माजी महापौर विष्णू भंगाळे, माजी शिक्षण विस्तार अधिकारी सुमित्र अहिरे समता परिषदेचे राज्य प्रदेशाध्यक्ष आप्पासो भरतजी शिरसाठ प्राथमिक विभागाचे माजी राज्य अध्यक्ष सूर्यकांतजी गरुड राज्य सदस्य डी.एम.मोतीराय,कास्ट्राईबाचे विभागीय अध्यक्ष अनिल सुरडकर, राज्यउपाध्यक्ष रावसाहेब जगताप.वि.अध्यक्ष बी.एन.पाटील महिला आघाडीच्या जिल्हाअध्यक्षा छाया बैसाने,सोनवणे.जिल्हा उपाध्यक्षा अश्विनी कोळी, गणेश बच्छाव,भैय्यासाहेब सोनवणे,यांच्या उपस्थितीत सरदार वल्लभ भाई पटेल सभागृह जळगाव येथे गो.दे.ढाके माध्यमिक विद्यालय एनगाव येथिल उपशिक्षक एम.पी.कोळी यांची पूर्व विभाग जिल्हाउपाध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली याप्रसंगी त्यांना प्राथमिक विभागाचे माजी राज्य अध्यक्ष सूर्यकांत गरुड यांच्या हस्ते निवड करण्यात येऊन गौरविण्यात आले. त्यांच्या या निवडीबद्दल विद्यालयाचे मुख्याध्यापक पी.एम.गुडडम,शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व संस्थेचे चेअरमन एन.डी. बोंडे या सर्वांनी त्यांच्या या निवडीबद्दल अभिनंदन केले तसेच परिसरातून त्यांचे अभिनंदन होत आहे.

दैनिक महाराष्ट्र सारथी दिपावली 2021अंकाचे प्रकाशन तत्कालीन जळगाव जिल्ह्याचे एस पी धनंजय मुंडे साहेब यांच्या हस्ते करण्यात आले. फोटोमध्ये धनंजय मुंडे साहेब व दैनिक महाराष्ट्र सारथी संपादकीय टीम

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!