राष्ट्रवादी काँग्रेस शिक्षक आघाडी जळगाव महानगर तर्फे माध्यमिक वेतन अधीक्षकांना शिक्षकांच्या वेतन समस्यांसंदर्भात निवेदन !

नवीन वाहनांच्या मदतीने गुन्हेगारी कमी करण्याकरिता प्रयत्न करा – पालकमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश

जळगाव प्रतिनिधी- (सागर पाटील सर)

जळगाव येथील राष्ट्रवादी काँग्रेस शिक्षक आघाडी जळगाव महानगर तर्फे श्री.अभिषेक पाटील महानगर अध्यक्ष राष्ट्रवादी काॅंग्रेस जळगाव महानगर यांच्या मार्गदर्शनाखाली माध्यमिक वेतन पथक अधीक्षक श्री. शर्मा साहेबांना वेतनासंदर्भात निवेदन देण्यात आले.याप्रसंगी विविध विषयांवर शिक्षकांच्या वेतनाच्या समस्यांवर चर्चा करण्यात आली त्यात सप्टेंबर 2021 या महिन्याचे वेतन अजूनही झालेले नाही.सणासुदीच्या पार्श्‍वभूमीवर वेतन लवकर करावे अशी सकारात्मक चर्चा करण्यात आली तसेच कोरोना काळातील मेडिकल बिलासंदर्भात सुद्धा चर्चा करण्यात आली तसेच दिवाळी सणाच्या पार्श्‍वभूमीवर ऑक्टोबर 2021 या महिन्याचे वेतन लवकरात लवकर करून मिळावे अशी मागणीदेखील करण्यात आली
याप्रसंगी निवेदन देताना शिक्षक आघाडी श्री.हेमंत सोनार (अध्यक्ष) श्री.प्रवीण धनगर (सचिव) श्री.मनोज भालेराव (कार्याध्यक्ष)श्री. सागर पाटील (सरचिटणीस) श्री.पांडुरंग पवार (सहसरचिटणीस) श्री.पंकज सूर्यवंशी (सहसचिव) श्री. विजय विसपुते (उपाध्यक्ष )आणि इतर पदाधिकारी तसेच महाराष्ट्र जुनी पेन्शन हक्क संघटनचे जिल्हा अध्यक्ष श्री.अजय पाटील देखील उपस्थित होते .

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!