शासनाच्या पैशावर अधिकार्‍यांनी मारला डल्ला बांधकाम कामगारांची बोगस नोंदणीचा केला प्रताप…

दैनिक महाराष्ट्र सारथी जळगाव प्रतिनिधी दीपक दाभाडे.

जितेंद्र अशोक बारी (युवा सेना समन्वयक जळगाव जिल्हा) यांनी मा.सहाय्यक कामगार आयुक्त जळगाव यांना निवेदन देऊन चौकशीची केली मागणी

जळगाव -शासन नियमानुसार बांधकाम कामगार यांना महाराष्ट्र शासनाच्या वतीने नोंदणीकृत बांधकाम कामगारांना इतर साहित्य व वस्तू या पुरवल्या जातात दुकान निरीक्षक जळगाव श्री.अ.मु सौदागर हे ज्या दिवसापासून संबंधित पदावर रुजू झाले तेव्हापासून ते आज पावतो त्यांच्याकडून करण्यात आलेल्या बांधकाम कामगारांच्या ऑफलाइन पद्धतीने झालेल्या नोंदणीची चौकशीची मागणी युवासेना यांनी मा.सहाय्यक कामगार आयुक्त जळगाव यांचेकडे केलेली आहे. तसेच संबंधित अधिकारी यांनी केलेल्या आर्थिक भ्रष्टाचारातून लाखो रुपये कमावले असल्याने निलंबीत करण्यात येऊन त्याची सखोल चौकशी करण्यात यावी व केलेल्या भ्रष्टाचाराचे हे पैसे शासन तिजोरीत जमा करावे.

संबंधित अधिकारी हा सन १९९९ पासून जळगाव येथे कार्यरत असून यामागे त्याला राजकीय वरदहस्त असण्याची दाट शक्यता वर्तवली जात असून तसेच बांधकाम कामगारांची संपूर्ण कुटुंब व कमी वय असलेल्या कामगारांची ही नोंदणी केलेली असून याबाबत आम्ही सर्व पुरावे सहित विशेष चौकशीची मागणी जळगाव जिल्हा युवासेना कडून करण्यात येत आहे निवेदनावर जितेंद्र बारी,पियुष गांधी, ज्ञानेश्वर निंबाळकर, कैलास बारी मिलिंद शेटे, सुरज दायमा,अतुल साळुंके, यांच्या स्वाक्षरीचे निवेदन देण्यात आले.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!