उपक्रमशील शिक्षक विजय लुल्हे श्री गुरु गोविंदसिंह मानवसेवा आदर्श राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित…

उपक्रमशील शिक्षक विजय लुल्हे श्री गुरु गोविंदसिंह मानवसेवा आदर्श राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित…

जळगाव प्रतिनिधीं – तरसोद जिल्हा परिषद शाळेतील उपक्रमशील शिक्षक विजय लुल्हे यांना अ .भा .श्री.गुरुदेव सेवामंडळ गुरुकुंज आश्रम, मोझरी जि .अमरावती संचलित श्री .गुरुदेव सेवामंडळ,जळगाव तर्फे श्री गुरु गोविंदसिंह मानवसेवा आदर्श पुरस्कार : २०२१ जळगाव येथील अल्पबचत सभागृहात दि .१९ सप्टेंबर २०२१ रोजी राष्ट्रीय पुरस्कार वितरण सोहळ्यात स्मृतिचिन्ह व गौरवपत्र देवून समाज सेविका सुमनबाई तोगरे ( पनवेल ) यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भानुदास शिंदे ( नायब तहसिलदार , पारोळा ) ,संयोजक हरिश्चंद्र बाविस्कर यांसह मान्यवर उपस्थित होते .
लुल्हे यांनी कोविड-१९ महामारीकाळात स्वतःच्या वाढदिवसानिमित्त स्थलांतरित मजुरांना फलाहार व अन्नदान,वयोवृद्ध मंडळींना वाफ घेण्याचे मशीन भेट,सफाई कामगार महिलांना व विद्यार्थ्यांना सॅनिटायझर व मास्कचे मोफत वाटप केले .दलितांना दिवाळी फराळ तसेच वापरण्या योग्य जुन्या कपड्यांचे वाटप, लोकवर्गणीतून यावल तालुक्यात प्रत्येक शाळांना चरित्रात्मक एकूण एक हजार पुस्तकांचे मोफत वितरण , स्वच्छता अभियानांतर्गत सुकन्या सुवर्णा व समीक्षा लुल्हे यांच्या वाढदिवसानिमित्त भिल्ल आदिवासी कुटूंबियांना स्टीलचे ओगराळे वाटप , क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त शिक्षण दिन साजरा करतांना जिल्ह्यातील शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक, औद्योगिक क्षेत्रातील मान्यवर महिला भगिनींना समारंभ पूर्वक स्मृतिचिन्ह देऊन सत्कार .शिक्षक दिन , जागतिक वृद्ध दिन, मातृदिन , डॉक्टर्स डे ,अभियंता दिन या विशेष दिनाला संबधित क्षेत्रातील नामवंतांचा त्याचप्रमाणे परीक्षेत उज्ज्वल यश प्राप्त करणाऱ्या प्रतिभावंत विद्यार्थ्यांसह कला, क्रिडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा स्वखर्चाने सत्कार करणे .आर्थिक दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांना लेखन साहित्य वाटप आणि मूल्याधिष्ठित सर्वगुणसंपन्न विद्यार्थ्यांना स्वर्गीय गुरुजनांच्या स्मरणार्थ आदर्श विद्यार्थी व विद्यार्थीनीला पुरस्कारात स्मृतिचिन्ह देऊन गौरवितात .तसेच स्वखर्चाने वर्गसुशोभन करतात .सुतार समाज वस्तीगृह बांधकामाला , पर्यावरण शाळेला बीज संकलन केंद्राला देणगी दिली .आजतागायत त्यांना मिळालेली पुररकाराच्या राशीमध्ये ते स्वतःचे पैसे वाढवून तत्काळ त्याच संस्थेला कृतज्ञतापूर्वक देणगी देतात . विश्ववंद्य भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त व महात्मा फुले यांच्या १२५ व्या पुण्यतिथीनिमित्त ‘ विचार जागर अभियान ‘ राबविले . या अभियानांतर्गत ग्रामीण भागात बाबासाहेबांचे राष्ट्रीय विचार व महात्मा फुले यांचे अखंड स्वहस्ताक्षरात आणि स्वखर्चाने भित्ती फलक लेखन केले आणि या समाजसुधारकांच्या चित्रांन्वये शाळाबाहय रंगभरण स्पर्धा घेऊन सर्वोत्तम कलावंत विद्यार्थ्यांना समारंभपूर्वक सन्मानित केले .समाज सुधारकांच्या प्रतिमा जयंती व पुण्यतिथीच्या औचित्याने शासकीय कार्यालयांना सप्रेम भेट देतात .नैसर्गिक आपत्ती – भुकंपग्रस्त , पुरग्रस्त व कारगील शहीदांच्या निराधार कुटूंबियांसाठी मुख्यमंत्री निधीसाठी लोकवर्गणी संकलित केली . मरणोत्तर नेत्रदान व देहदान यासाठी जनप्रबोधन तसेच रक्तदान शिबिरांचे आयोजन, जनमानसांत वैज्ञानिक दृष्टीकोण रुजविण्यासाठी फटाकेमुक्त अभियान, सार्वजनिक पर्यावरणवादी होळी व स्मशान भूमीत वाढदिवस कार्यक्रमांचे यशस्वी आयोजन . परिसर स्वच्छता अभियानांतर्गत व्यक्तिशः सार्वजनिक शौचालये, बसस्थानकांची साफसफाई करणे .समाजातील अंधश्रद्धा निर्मूलन व तंबाखू मुक्तीसाठी व्याख्यानांचे आयोजन प्रसंगी स्वतः व्याख्यानं देणे .जल – जमीन – जंगल संरक्षणार्थ कार्यक्रमाचे आयोजन . बुवाबाजी भंडाफोड, धरणे आंदोलने, निषेध मोर्चा, निवेदन देणे यात सक्रिय सहभाग. लोकसहभागातून तसेच स्वखर्चाने सार्वजनिक ठिकाणी जागतिक वनदिन व पर्यावरण दिनानिमित्त वृक्षारोपण व हमरस्त्याच्या दुतर्फा बीजारोपण करीत असतात . समाजाच्या निरोगी, निरामय, सुदृढ आरोग्यासाठी आरोग्य मासिकांचा प्रसार व प्रसार, अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्राचे ( मासिक ) कमिशन न घेता १००० वर्गणीदार अल्पकाळात नोंदविले .वाचन अभिरुची संवर्धनासाठी मोफत वाचनालयाची स्थापना .’ ना नफा ना तोटा ‘ या तत्त्वावर पाच वर्ष नाममात्र पन्नास रुपयात पन्नास दर्जेदार दिवाळी अंक वाचकांना वर्षभरासाठी उपलब्ध करून दिले.सावित्रीबाई फुले यांच्या प्रेरणादायी कवितांचे मोफत वितरण .जिल्हा परिषद शिक्षकांसाठी भारतरत्न डॉ. एपीजे अब्दुल कलाम पुस्तक भिशीची जळगावी स्थापना . ‘ युगपुरुष ‘ या महात्मा गांधी विशेषांकाचे मोफत वितरण . परिसरातील विविध शैक्षणिक संस्थांना ,वाचनालयांना व आप्तेष्टांना कार्यक्रमानुषंगे दर्जेदार ग्रंथांची भेट देतात .’ स्तुनामी मृत्यू तांडव ‘ , वन्यजीव सप्ताहानिमित्त छायाचित्र प्रदर्शन , विविध क्षेत्रातील कर्तृत्ववान महिलांचे कार्यात्मक चित्रप्रदर्शन ,’ मधूमेह एक जीवन साथी ‘ मरणोत्तर नेत्रदान श्रेष्ठदान ‘,’ मोहन ते महात्मा प्रदर्शन,विद्यार्थी निर्मित राख्यांचे प्रदर्शनं आयोजित करतात .महात्मा गांधीप्रणीत ‘ सात सामाजिक पातके ‘ व ‘ एकादश व्रते ‘ छापील पोस्टर्स मान्यवरांना सप्रेम भेट योजना असे अनेकोत्तम ज्ञानरचनावादी शैक्षणिक ,सामाजिक, सांस्कृतिक,पर्यावरणीय समाजाभिमुख प्रेरणादायी कार्यक्रमांची दखल घेऊन श्री .गुरुदेव सेवा मंडळाचे अध्यक्ष हरिश्‍चंद्र बावस्कर यांनी विजय लुल्हे यांना श्री गुरु गोविंदसिंह मानवसेवा आदर्श राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित केले .
विजय लुल्हे अखिल भारतीय साने गुरुजी कथामाला ( मुंबई ),पक्षीमित्र संघटना ( चिपळूण ),मराठी विज्ञान परिषद ( जळगाव ) या संस्थाचे आजीव सभासद आहेत. लुल्हे यांनी अपंग कल्याण संस्था व नेहरू युवा एकता मित्र मंडळ यांच्या सल्लागारपदी राहून काही काळ मार्गदर्शन केले आहे. लुल्हे यांना आजतागायत राज्यस्तरीय भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदर्श कर्मचारी पुरस्कार ,राष्ट्रसंत तुकडोजी महाराज पुरस्कार ,आद्यकवी महर्षी वाल्मीक आदर्श शिक्षक पुरस्कार ,कर्तव्यदक्ष शिक्षक पुरस्कार ,काव्य भूषण पुरस्कार तसेच जिल्हास्तरीय महात्मा ज्योतिबा फुले गुणवंत शिक्षक पुरस्कार ,नेशन बिल्डर अवार्ड ,कर्मवीर भाऊराव पाटील पुरस्कार , आदर्श शिक्षक पुरस्कार ,राष्ट्रपिता महात्मा फुले आदर्श शिक्षक पुरस्कारासह अन्य समर्थ कला शिक्षक पुरस्कार प्राप्त झाले आहेत. विशेष म्हणजे शहीद नरेंद्र दाभोळकर यांच्या हस्ते त्यांना शतकवीर पुरस्काराने गौरव झाला आहे. पर्यावरणीय कामाची विशेष दखल घेऊन त्यांना पर्यावरण शाळेतर्फे ‘ वसुंधरा हरित शिक्षक पुरस्कार ‘ प्राप्त झाला आहे .कलाधिष्ठित उपक्रमशीलतेबाबत २ बॉझ पदकही त्यांना प्राप्त झाली आहेत.आकाशवाणी जळगाव केंद्रावरही कार्यक्रम प्रसारित होतात. लुल्हे कवी, लेखक असल्याने त्यांचे लेख, कविता दर्जेदार दिवाळी अंक ,मासिके व वृत्तपत्रातून प्रकाशित होत असतात. विजय लुल्हे यांचे पुरस्कार मिळाल्या प्रित्यर्थ निवृत्त माध्यमिक शिक्षणाधिकारी निळकंठ गायकवाड, निवृत्त शिक्षण उपसंचालक ( प्राथमिक ) ,शशिकांत हिंगोणेकर , निवृत्त माध्यमिक उपशिक्षणाधिकारी सिद्धार्थ नेतकर,अंधश्रद्धा निर्मूलनचे कार्यकर्ते दिगंबर कट्यारे ,प्रकाशक युवराज माळी, ज्येष्ठ पत्रकार नुरुद्दीन मुल्लाजी, पत्रकार शेखर पाटील, पत्रकार राकेश कोल्हे ,पत्रकार दीपक महाले,पत्रकार शिवाजी शिंदे ,संपादक शैलेंद्र ठाकूर, डॉ. मिलिंद बागुल, ललित कला केंद्र प्राचार्य राजेंद्र महाजन ( चोपडा ), चित्रकार सुनिल दाभाडे , ह.भ.प. मनोहर खोंडे महाराज यांसह अधिकारी,पदाधिकारी ,आप्तेष्ट यांच्याकडून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे .

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!