नारीशक्ती ग्रूप जळगाव तर्फे पर्यावरण पूरक उपक्रम निर्माल्य संकलन…

नारी शक्ती ग्रुप सोबत महापौर जयश्रीताई महाजन

जळगाव प्रतिनिधी-आज दिनांक १९ रविवार रोजी अनंत चतुर्दशी म्हणजेच गणपती विसर्जन यानिमित्ताने पर्यावरणाचा ऱ्हास होऊ नये म्हणून पर्यावरण वाचविण्याच्या दृष्टीने पर्यावरणपूरक निर्माल्य संकलन हा उपक्रम मेहरुण तलाव गणेशघाट जळगाव येथे नारीशक्ती ग्रूप तर्फे राबविण्यात आला.

निर्माल्य पाण्यात विसर्जन करून कोणत्याही प्रकारची जलहानी होऊ नये या दृष्टीने सर्व निर्माल्य एकाच ठिकाणी संकलित करून त्याची विल्हेवाट लावण्यासाठी पर्यावरणप्रेमीं नारीशक्ती ग्रूपच्या महिलांनी निर्माल्य संकलन व सोबत श्री गणेश मुर्ती संकलन सकाळी 10 वाजेपासून संध्याकाळपर्यंत राबवून श्री गणेश विसर्जनासाठी अनमोल सहकार्य केले.

या प्रसंगी महापौर जयश्रीताई महाजन ,वृक्षसंवर्धन समिती अध्यक्ष श्री चंद्रशेखर नेवे उपस्थित होते.यात नारीशक्ती ग्रुप अध्यक्ष मनिषा पाटील, सुमित्रा पाटील, भावना चव्हाण, ॲड सीमा जाधव, ज्योती राणे, आरती शिंपी ,माधुरी जावळे, बेबीताई खोडपे,मनीषा शिरसाट, अर्चना पाटील, रुद्राणी देवरे, वंदना पाटील, योगिता बाविस्कर यांचा समावेश होता. या पर्यावरण रक्षण उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

✍🏻शोषित, पीडित, दलित, वंचितांचा बुलंद आवाज दैनिक “महाराष्ट्र सारथी”
आमचा दैनिक “महाराष्ट्र सारथी” या नावाने मराठी अंक सुरू असुन.
सदर अंक जळगाव,धुळे ,नंदुरबार, नाशिक, या ठिकाणी सुद्धा प्रसिद्ध करण्यात येतो.
आपल्याकडे आपण केलेले काही चांगले कार्य, लेख, कविता ,माहिती, आयुर्वेद, सौंदर्याविषयी, सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, कार्या विषयी जनजागृती करायची असल्यास आम्हाला खालील व्हाट्सअप नंबर वर माहिती पाठविल्यास आम्ही मोफत प्रसिद्धी देवु.
सदर लेख बातमी पाठवताना टाईप करून फोटो सह पाठवावे
(पत्रकारितेची आवड असल्यास अवश्य संपर्क साधावा…)
आपला शुभचिंतक
शैलेंद्र विठ्ठल ठाकूर
कार्यकारी संपादक
जळगाव
🪀9860085700

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!