हस्ती बँकेतर्फे दोंडाईचा कोविड केअर सेंटरला २० जंबो ऑक्सीजन सिलेंडर प्रदान!

प्रतिनिधी संजय कोळी दोंडाईचा

दोंडाईचा:- मुख्यालय असलेल्या व राज्यभर कार्य विस्तारासोबत नावलौकिक प्राप्त, उत्तर महाराष्ट्रातील अग्रगण्य दि हस्ती को-ऑप. बँकेतर्फे व अशोकभाऊ जैन यांचे मार्गदर्शनाने कोविड केअर सेंटर, कामगार भवन दोंडाईचा येथे ३ लाख रूपये किंमतीचे २० जंबो ऑक्सिजन सिलेंडर प्रदान करण्यात आले.

परिसरात कोरोना रूग्णांची संख्या दररोज वाढत आहे. तसेच रूग्णांना ऑक्सिजन वेळेवर उपलब्ध व्हावा. याकरिता तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय शिंदखेडा यांचेकडून ८ एप्रिल ला प्राप्त पत्रान्वये हस्ती बैंकेच्या संचालक मंडळाने तातडीने आज ९ एप्रिल ला सदर सिलिंडर उपलब्ध करून दिले. यामुळे ऑक्सिजन बेडची व्यवस्था करण्यासाठी मेटाकुटीला आलेल्या प्रसंगी निराश झालेल्या नातेवाईकांना या ऑक्सीजन सिलिंडरमुळे मोठा दिलासा मिळणार आहे

यावेळी हस्ती बैंकेचे वतीने प्रेसिडेंट कैलास जैन, व्यवस्थापकिय संचालक प्रकाश कुचेरिया, सरव्यवस्थापक माधव बोधवाणी, डॉ. हितेंद्र देशमुख, डॉ. प्रफुल दुग्गड, डॉ. सचिन पारख, पत्रकार मनोहर देवरे हे मान्यवर उपस्थित होते.

विशेष म्हणजे यापूर्वीही पंतप्रधान कोविड सहाय्यता निधी व मुख्यमंत्री कोविड सहाय्यता निधीला प्रत्येकी रूपये ५ लाख प्रदान केलेले होते. तसेच हस्ती बँकेचे संचालक व समिती सदस्य यांनीही ३ लाख रूपयांची देणगी मुख्यमंत्री कोविड सहाय्यता निधीला दिलेली होती.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!