ऐनपुर येथे घाणीचे साम्राज्य, नागरिकांचे आरोग्य धोक्यात प्रशासनाचे दुर्लक्ष…

दैनिक महाराष्ट्र सारथी ऐनपुर प्रतिनिधी विजय अवसरमल यांचे कडून

ऐनपूर मधील नागरीकांच्या आरोग्याचा प्रश्न एरणीवर आला आहे. तरी संबंधित प्रशासन याबाबत नागरिकांच्या आरोग्याचा विचार करुण दखल घेईल का? असा प्रश्न निर्माण होत आहे.

रावेर तालुक्यातील ऐनपुर येथील बस स्थानक पासून अगदी हाकेच्या अंतरावर ऐनपुर-खिरडी रस्त्याने सार्वजनिक शौच्यालय जवळ घानीचे साम्राज्य झालेले असून अस्वच्छता पसरली आहे त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आलेले आहे.
ऐनपुर-खिरडी रसत्याने बस स्थानकाच्या अगदी हाकेच्या अंतरावर सार्वजनिक शौच्यालय जवळ अस्वच्छता व घाणचघाण झालेली दिसून येत आहे,अशा स्थितीत ऐनपुर खिरडी रसत्याला लागुन असलेल्या वाल्मीक नगर तसेच इतर प्लाट मधील रहिवास असलेल्या नागरिकाना याच रसत्याने ये-जा करावी लागते तसेच खिरडी रोड वरिल मुख्य रस्ता असल्याने रसत्याने ये-जा करणाऱ्या वाहनधारकांना या घाणीचा सामना करावा लागतो तसेच या घाणीच्या ठिकानच्या काही अंतरावर लोकांची घरे सुद्धा आहेत. विशेष म्हणजे सद्या पावसाळ्याचे दिवस असल्याने
येथे डास,मच्छर होण्याची शक्यता नाकारता येत नाही या डास व मच्छरांमुळे विविध प्रकारचे आजार उद्भवन्याची दाट शक्यता आहे तरी सुद्धा संबंधित प्रशासन याकडे लक्ष द्यायला तयार नसल्याचे चित्र दिसते.
‘स्वच्छ भारत..स्वच्छ गाव’चा नारा देत आपले शहर व गाव स्वच्छ ठेवण्याकडे शासन व प्रशासनाकडून वेळोवेळीआवाहन करण्यात येते.गाव आणि शहर स्वच्छतेवर मोठा भर देण्यात येतो.मात्र असे अस्वछतेचे चित्र बघून तालुक्यातील या गावाची वाटचाल ही तेवढ्याच झपाट्याने अस्वच्छतेकडे होत असल्याचे दिसते त्यामुळे परिसरातील नागरीकांच्या आरोग्याचा प्रश्न एरणीवर आला आहे. तरी संबंधित प्रशासन याबाबत नागरिकांच्या आरोग्याचा याबाबत विचार करुण याविषयी दखल घेईल का? असा प्रश्न निर्माण होत आहे.

वृक्ष संवर्धन काळाची गरज.. झाडे लावा झाडे जगवा
बातमी शेअर करा :
error: Content is protected !!