वरणगाव प्रभाग क्रमांक ९ येथील रस्त्याचे तीन-तेरा होत आता वाजले की बारा…

दैनिक महाराष्ट्र सारथी भुसावळ तालुका ग्रामीण प्रतिनिधी प्रशांत पाटील

वरणगाव शहर प्रभाग क्रमांक ९ मधील नागरिकांचे घराबाहेर निघत रस्ता वापर करणं म्हणजे जणू युद्धजन्य परिस्थिती होय.

वरणगावशिवाजीनगर येथील नागरिकांनी नगर परिषद प्रशासन यांना वेळोवेळी दुरावस्था झालेल्या रस्त्याची तक्रार करूनही स्पष्टपणे दुर्लक्ष केले जात आहे
कोरोना संसर्ग आजारामुळे वरणगाव नगरपरिषद येथे गेल्या दोन वर्षापासून प्रशासक हे नेमण्यात आले असून प्रभाग निहाय नागरिकांना वेगवेगळ्या विषयी येणाऱ्या समस्या चा सामना करावा लागत आहे मोजक्या काही समस्याचा या नगरपरिषद कडून सोडवल्या जातात तर काही समस्यांकडे साफ दुर्लक्ष हे केले जात आहे.

प्रभाग क्रमांक ९ स्थित नागरिकांकडून अधिक माहिती मिळाली असता
येथील स्त्रिया व पुरुषांचा चिखलमय रस्त्याविषयी रुद्र अवतार बघावयास मिळाला आहे
आम्हाला नगर परिषद कडून जणु काही असा चिखलमय रस्ता भेट बक्षीस स्वरूपात मिळाला की काय हेच कळेनासे झाले आहे
यासंदर्भात प्रभाग क्रमांक ९ मधील सामाजिक कार्यकर्ते महेश सोनवणे यांना चिखलमय झालेल्या रस्त्याची माहिती मिळताच क्षणी हजर होत
रस्त्याची झालेली दयनीय अवस्था बघून महेश सोनवणे हे काही क्षण भिरभिरल्यागत मनोमनी स्तब्ध झाले होते
लागलीच आपल्या भ्रमणध्वनी द्वारे संवाद साधत तीन ते चार मुरुम डंबर हे स्वखर्चाने आणत चिखलमय झालेल्या रस्त्यावर जे सी बी मशिन द्वारे पसरवण्यात आले असुन होणारे लहान-मोठे अपघात हे आता टळणार आहेत व जनहित केलेल्या कार्यामुळे वार्डातील नागरिकांचा आनंद हा द्विगुणित झालेला आहे.
जसे कोरड्या तळाचे पाणी भरल्यानंतरच रुप पालटून तळाला शोभा येते
तसेच चिखलमय व खड्डेमय रस्त्यावर डांबर किंवा मुरुम पडल्यावरच रस्त्याला शोभा येतेे .यासंदर्भात शिवाजीनगर येथील नागरिक लक्ष्मण भालेराव संजय पाटील गणेश इंगळे मस्के उल्हास पाटील चित्ते मीराबाई कोडी भास्कर काळे विषाल चौधरी आशिष शेजुळे यांनी सामाजिक कार्यकर्ते महेश सोनवणे यांचे मनःपूर्वक आभार व्यक्त केले आहे
.

✍🏻दैनिक “महाराष्ट्र सारथी”
जळगाव जिल्ह्यातील प्रत्येक बातमी आता आपल्या स्मार्टफोनवर !
आपण आपल्या परिसरातील बातमी 95940 47437 या व्हाट्सअप क्रमांकावर पाठवू शकता.
आपण आपल्या नावाने बातमी दिल्यास आमच्या दैनिक मध्ये प्रसिद्धी केली जाईल.
आपला विश्वासू
प्रशांत पाटील
भुसावळ तालुका ग्रामीण प्रतिनिधी
दैनिक “महाराष्ट्र सारथी”
95940 47437

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!