कुठलेही बीज न पेरता उगवणाऱ्या रानभाज्या निसर्गाने मानवाला दिलेली अमूल्य भेट..

दैनिक महाराष्ट्र सारथी भुसावळ ग्रामीण प्रतिनिधी प्रशांत पाटील.

वरणगाव शहर येथे संत मुक्ताई कृषी विज्ञान मंडळ रानभाज्या महोत्सव आयोजित करण्यात आलेला असून पंचायत समिती सभापती भुसावळ वंदना उन्हाळे यांच्या हस्ते फीत कापून विक्रीस सुरुवात करण्यात आली.

मानवी आहारात प्रामुख्याने वनस्पतीचा समावेश असतो धान्य कडधान्य यानंतर मानवी आहारातील प्रमुख घटक म्हणजे भाजी आपल्या आहारात भाजी म्हणून खोड पाने फळे बिया कंदमुळे याचा वापर केला जातो भारतात भाजीच्या सुमारे पंचावन्न प्रजाती आहेत .
भाज्या उत्पादनात झटपट वाढ करण्यासाठी अमर्यादित प्रमाण रासायनिक खतांचा द्रव्यांचा वापर पिकांवर केला जात आहे यामुळे त्याची नैसर्गिक प्रतिकारशक्ती कमी होत आहे जगभरात वनस्पती या ३२ लाख ८३ हजार असून भारतीय आदिवासी १५३० पेक्षा अधिक वनस्पती त्यांच्या दैनंदिन जीवनात खाण्यासाठी वापर करतात सुमारे १४ वनस्पती या मधुमेह व पोट दुखी खोकला याचा औषधी म्हणून तर काही वनस्पती गर्भवती महिला आणि इतर व्यक्तींसाठी अतिशय उपयुक्त ठरलेल्या आहेत सिक्कीम जगातील सर्वात पहिले ऑरगॅनिक राज्य याच राज्याच्या धर्तीवर भारतात इतर राज्ये ही ऑरगॅनिक ठरणार का केमिकलयुक्त पिकांवर केले जाणारे फवारे मुळे मानवी शरीराला सकस आहार हा दुर्मिळ झालेला आहे .

केमिकलयुक्त फळ भाज्या समाविष्ट झाल्यामुळे येणाऱ्या काळात घातक असे परिणाम मानवी शरीरावर होणार हे मात्र कटू सत्य आहे

याप्रसंगी उपस्थित वरणगाव नगर परिषद अधिकारी पंकज सूर्यवंशी तालुका कृषी अधिकारी धनंजय पोळ टेक्निकल मॅनेजर कृषी विभाग प्रमोद जाधव व इतर अधिकारी कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित होते.

भाजीपाल्या मधले नैसर्गिक तत्व हे कमी होत आहे
निसर्ग नियमानुसार ज्या त्या हवामानानुसार भाज्या पिकवल्या गेल्या पाहिजे आता तसे नाही
ऑरगॅनिक पीक घेण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. डॉक्टर गणेश विष्णू पाटील
हार्ट स्पेशलिस्ट ( रिदम हॉस्पिटल भुसाव

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!