चंद्रकांत पाटील यांची कन्या विजयी

धुळे,

राज्यातील सहा जिल्ह्या परिषद पोटनिवडणुकीचे निकाल हाती आले आहेत. धुळे जिल्ह्यात भाजपने पुन्हा आपले वर्चस्व कायम राखले आहे. भाजपचे माजी मंत्री आमदार जयकुमार रावल यांनी पुन्हा शिंदखेडा तालुक्यात आपले वर्चस्व कायम राखण्यास यश मिळवले आहे. लामकानी जिल्हा परिषद गटातून चंद्रकांत पाटील यांची कन्या धरती देवरे या विजयी झाल्या आहेत.

धुळे जिल्हा परिषद लामकानी गावातील भाजपच्या उमेदवार धरती देवरे सुमारे 4 हजार 96 मतांनी विजयी झाल्यात. धरती या गुजरात भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (आर.सी.पाटील) यांच्या कन्या होत. धुळ्यात भाजपला बहुमतासाठी 14 पैकी दोन जागांची गरज होती. या ठिकाणी जिल्हापरिषद 15 आणि पंचायत समितीच्या 30 जागांसाठी मतदना झाले.

धरती देवरे यांना भाजपकडून मिळाली होती. त्याआधी मागील निवडणुकीत त्या विनविरोध निडणून आल्या होत्या. सध्या धुळे जिल्हा परिषदेत भाजपची सत्ता आहे. 56 पैकी 27 जागा भाजपकडे आहेत. शिवसेना 2, राष्ट्रवादी 3 तर काँग-ेसकडे 6 जागा आहेत. धरती देवरे यांच्या विजयानंतर भाजपला बहुमत मिळाले आहे.

धुळे जिल्हा परिषद गट निकाल

– भाजप – 5

– काँग-ेस – 00

– राष्ट्रवादी काँग-ेस – 02

– शिवसेना – 01

दरम्यान, शिंदखेडा तालुक्यातील चार जागांपैकी तीन जागांवर भाजपचे उमेदवार विजयी झाले आहेत. तर एक जागेवर राष्ट्रवादी काँग-ेसचा विजय झाला.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!