’अजितदादांना मुख्यमंत्रिपदाची संधी दिली पाहिजे’, जुनी कार्यकर्ती म्हणत चित्रा वाघ यांची मागणी

धुळे,

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना त्यांच्याच पक्षाने पुण्याच्या पिंपरी-चिंचवडमध्येच अडकवून ठेवल्यासारखी स्थिती आहे. परंतु, अजितदादांना अडीच वर्ष मुख्यमंत्रिपदाची संधी मिळाली पाहिजे, अशी अपेक्षाच कधी काळी राष्ट्रवादीत असलेल्या भाजपच्या महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांनी व्यक्त केली आहे.

धुळे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीचा प्रचारासाठी चित्रा वाघ आल्या होत्या. यावेळी त्यांनी शेतकर्?यांच्या मदतीच्या प्रश्नावरुन महाविकास आघाडी सरकारवर सडकून टीका केली.

’अजितदादा हे प्रचंड क्षमता असलेले नेते आहेत. मी त्यांच्यासोबत काम केलेली कार्यकर्ती आहे. अडीच वर्ष शिवसेनेला आणि अडीच वर्ष राष्ट्रवादीला मुख्यमंत्रिपद देण्याचं मी मध्यंतरी ऐकलं होतं. परंतु, ही त्यांची पक्षांतर्गत गोष्ट आहे. तरीही राष्ट्रवादीने अजितदादांना मुख्यमंत्रिपदाची संधी द्यायला काहीच हरकत नाही, असं माझ्या सारख्या कार्यकर्तीला वाटत आहे’ अशी मागणीच चित्रा वाघ यांनी केली आहे.

तसंच, ’एवढी क्षमता असलेल्या नेत्याला केवळ पुण्यातील पिंपरी-चिंचवडपर्यंतच अडकवून टाकल्यासारखी स्थिती सध्या दिसत आहे. यामुळेच त्यांच्या पक्षातील खासदाराने पिंपरी चिंचवडमधील भोसरी विधानसभेच्या आढावा बैठकीत ही खदखद व्यक्त केली असावी. असं मला वाटर्ते, असंही चित्रा वाघ यांनी स्पष्ट केले.

यानंतर चित्रा वाघ यांनी शिवसेनेचे खासदार संजय राऊत आणि आघाडी सरकारवर सडकून टीका केली. त्या म्हणाल्या की, ’तिन्ही पक्षातील नेते एकमेकांना सल्ले देताना दिसतात. ते सल्ले राज्यासाठी महत्वाचे नाहीत. राज्यात पूरपरिस्थिती आहे, शेतकर्?यांचे हाल होत आहे. युवकांना रोजगार नाही, महिला सुरक्षित नाहीत. आघाडी सरकारने लोकांना वेगवेगळे वादे केले होते. त्याचा महाविकास आघाडी सरकारला विसर पडलेला आहे’.

राज्याचे विरोधी पक्षाचे नेते देवेंद्र फडणवीस हे आज नुकसानीची पाहणी करण्यासाठी बांधावर गेलेले आहेत. नुकसानीचे पंचनामे न करता सर्वांना सरसकट मदत द्यावी, अशी आमच्या विरोधी पक्षनेत्यांची मागणी आहे. पण, काँग-ेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना यांना स्वत:च्या खुर्च्या उबविण्यातच अधिक रस आहे, असे विविध घटनांवरुन दिसत आहे, अशी टीकाही वाघ यांनी केली.

’आज विद्यार्थी सुद्धा त्रस्त आहे. आरोग्य विभागाच्या परीक्षांमुळे अनेक मुलांना मनस्ताप सहन करावा लागला. एमपीएससीच्या परीक्षेचा विषयामुळे लोणकर नावाच्या मुलाला जीव गमवावा लागला. एवढंच नाही तर साक्रीमधील एसटी विभागाच्या कर्मचार्?याला आत्महत्या करावी लागली. ती राज्यातली तिसरी आत्महत्या होती. महिला व मुलींवर रोज अत्याचार चालले आहेत. राज्याच्या दृष्टीने यांचा कलगीतुरा महत्वाचा नाही तर हे ऐरणीचे प्रश्न सोडविण्यासाठी महाविकास आघाडीने रस दाखविणे महत्वाचे आहे. पण, राज्यात सरकार नावाची यंत्रणा अस्तित्वात आहे की नाही, असा प्रश्न सर्वांनाच पडला आहे’, अशी टीका चित्रा वाघ यांनी केली.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!