कोरोना नियमांचं पालन करत गणरायाचं उत्साहात आगमन

धामोडी प्रतिनिधी- ( राहुल जैन )

ना गुलालांची उधळण ना ढोलताशाचा दणदणाट तरीही गणपती बाप्पा मोरया अशा घोषणा देत विघ्नहर्ता गणरायाचं आगमन धामोडी येथील जय भवानी गणेश मंडळाकडून उत्साहपूर्ण वातावरणात प्रतिष्ठापना केली.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मागील वर्षी उत्सवावर कडक निर्बंध होते .मात्र यंदा कोरोनाच्या रुग्णांच्या संख्येत घट झाल्याने राज्य सरकारने नियम शिथिल करत उत्सव साधेपणाने साजरा करण्यास परवानगी दिली आहे. याचाच एक भाग म्हणून जय भवानी गणेश मंडळ धामोडी येथे कोरोनाचे नियम पाळत टाळाच्या गजरात गणरायाचे स्वागत करण्यात आले.त्यावेळी गणेश महाजन,निवृत्ती पाटील,अरुण पाटील,दादू महाजन, नारायण कोळी,धीरज महाजन, इ पदाधिकारी सदस्य उपस्थित होते.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!