ब्रम्ह्पुरी तालुक्यातील रेती तस्करी तात्काळ थांबवा

ब्रह्मपुरी / चंद्रपूर-प्रतिनिधी :- (राहुल भोयर मो.9421815114)

ब्रम्हपुरी – तालुक्यातील हद्दीत येणाऱ्या वैनगंगा नदीपात्रातील जवळजवळ सात ते आठ रेतीघाटावरुन रात्रीच्या वेळी अवैध उपसा सुरू झालेला दिसुन येत आहे . हि रेती तस्करी महसुल विभागाने तात्काळ थांबवावी.तसेच त्या त्या शिवेत येणाऱ्या रेतीघाटातील ग्राम पंचायत च्या दक्षता समितीला जो अधिकार असतो त्याचा वापर करून गावाच्या विकासासाठी त्या दक्षता समितीने निधी उपलब्ध करून घ्यावा .व रेती तस्करी साठी सहकार्य करणाऱ्या ट्राक्टर मालक , महसुल विभागातील काही अधिकारी व ग्राम पंचायत ची दक्षता समितीतील काही सदस्य यांच्यावर कठोर कार्यवाही करावी .अश्या मागणीचे निवेदन वंचित बहुजन आघाडी च्या वतीने तहसीलदार मार्फत जिल्हाधिकारी व उपविभागीय अधिकारी यांना देण्यात आले .जर हि रेती तस्करी तात्काळ थांबली नाही तर पक्ष्याच्या वतीने येत्या आठ दिवसात तिव्र आंदोलन करु असा इशारा सुध्दा देण्यात आला यावेळी डॉ.प्रेमलाल मेश्राम , लिलाधर वंजारी , अश्व्जीत हुमने , अरुण सुखदेवे , डी एम रामटेके , डॉ विलास मैंद , सुखदेव प्रधान सर , मनीषा उमक , अनिल , नरेन्द्र मेश्राम , कांबळे , चंद्रमणी चहान्दे , निहाल ढोरे , पी बी रामटेके , एन आर मेश्राम , एच एन शेंडे ,आदि अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!