शहर व बाजारपेठ पो.स्टे. च्या रेकॉर्ड वरील गुन्हेगाराला सहा महिन्या साठी मा उपविभागीय दंडाधिकारी दिले हादपारीचा आदेश….

डीवायएसपी सोमनाथ वाघचौरे यांनी केले अनेक गुन्हेगारांच्या हद्दपारीचे प्रस्ताव

काही गुन्हेगार व टोळ्या याचे प्रस्ताव पेंडीग यासाठी DYSP यांचा पाठपुरावा

भुसावळ ( नाना पाटील )

बाजारपेठ पोलीस स्टेशन हद्दीत राहणारा रेकॉर्डवरील गुन्हेगार मोहम्मद नसीम मोह .सलीम शेख राहणार रिंग रोड प्रल्हाद नगर भुसावळ याचे विरुद्ध भुसावळ बाजारपेठ पोलीस स्टेशन यांचेकडून जानेवारी 2021 मध्ये त्याचे विरुद्ध महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 56(1) (अ)(ब) याप्रमाणे प्रस्ताव तयार करण्यात आला होता त्यानुसार मा. उपविभागीय दंडाधिकारी यांच्याकडून प्राथमिक चौकशीकामी सदरचा उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालय भुसावळ उपविभाग भुसावळ यांचेकडे प्राप्त झाल्याने त्या बाबत मोहम्मद नसीम मोह. सलीम शेख यांना कारणे दाखवा नोटीस बजावनी करून त्याच्या हद्दपारी बाबत त्याचे म्हणणे ऐकून घेऊन त्याचा प्राथमिक चौकशी अहवाल हा सन 2021 मध्ये सादर करण्यात आल्याने त्यावरून . उपविभागीय अधिकारी यांनी त्याच्याविरुद्ध खालील प्रमाणे दाखल गुन्ह्याच्या आधारावर हद्दपारीचे आदेश निर्गमित केले
सदरच्या गुन्हेगारावर भादविक 326, 323, 504, 506, 427 ,34, 342, आर्म एक्ट क्र. 4725 ,384 ,385, 510,427 असे विविध कलमांतर्गत विविध वेळी गुन्हे दाखल झालेले आहेत. हे सर्व गुन्हे शहर पोलीस स्टेशन व बाजारपेठ पोलीस स्टेशन अंतर्गत आहेत
सदर हद्दपार इसमानविरुद्ध गुन्हे दाखल असून त्याचे विरुध्द मा. उपविभागीय दंडाधिकारी भुसावळ भाग यांनी सादर केलेल्या चौकशी अहवालाच्या आधारावर हद्दपार इसम यास सहा महिन्यात अपार करण्यात आले आहे सदर हद्दपारी इसमास हद्दपार करणेकामी पोलीस निरीक्षक भुसावळ बाजारपेठ पो. स्टे. श्री दिलीप भागवत यांच्या मार्गदर्शनाखाली सहा. पो. नि. गणेश धुमाळे व सहा. पो. फौ. सुरेश सोनवणे यांनी कार्यवाही केली आहे हद्दपार आदेशाची बजावन प्रक्रिया पो. नि. बाजारपेठ यांच्याकडून सुरू आहे. मा.डीवायएसपी सोमनाथ वाघचौरे यांनी जनतेला आवाहन केले आहे आपल्याला जर कुणी गुन्हेगार त्रास देत असेल तर पोलीस प्रशासनाशी संपर्क साधा आपणास नक्की मदद केली जाईल.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!