राष्ट्रीय एकता रॅलीचे भुसावळ शहरात भव्य स्वागत

भुसावळ (प्रतिनिधी)-

भुसावळ शहरात राष्ट्रीय एकता रॅली CRPF जवानांचे भव्य स्वागत करण्यात आले मिळालेली माहिती अशी की दिनांक 12 ऑक्टोबर 2021 रोजी गडचिरोली येथून सीआरपीएफ जवानांची सायकल रॅली निघाली व ती केवडा (गुजरात) येथे दिनांक 31 ऑक्टोबर 2021 रोजी पोहोचेल व त्याचबरोबर संपूर्ण भारतातून CICF, BSF, CRPF, ITBP, यांच्या रॅली तेथे येथील त्याचबरोबर देशाचे पंतप्रधान मा. श्री. नरेंद्र मोदी जी व देशाचे गृहमंत्री सरदारवल्लभाई स्मारक केवडा येथे दिनांक 31 ऑक्टोबर 2021 रोजी येतील व या सर्वांचे उपस्थित आजादी एकता महोत्सव चा कार्यक्रम तेथे संपन्न होईल व या रॅलीच्या माध्यमातून देशाला एकता अखंडतेचा संदेश देण्यात येत आहे त्याच बरोबर सायकल चालवून जाण्याचा उद्देश देशातील जनसामान्य नागरिकाला कार मोटर गाडी चा उपयोग कमी करावा जेणेकरून प्रदूषण होणार नाही व आपले स्वास्थ पण निरोगी राहील असे केंद्रीय रिजर्व पुलिस बल चे अधिकारी साहेब यांनी माहिती दिली त्याचबरोबर भुसावळ शहरात खडका चौफुली येथे समस्त मुस्लिम समाजात बांधवांतर्फे व सोना मेडिकल चे संचालक अफताफ खान सर अमिन कुरेशी जमीन पिंजारी रफिक कुरेशी जी एन न्यूज चे मुख्य संपादक फिरोज तडवी शुभम तायडे व असंख्य जनतेचे उपस्थित सोना मेडिकल चे संचालक अफताप खान सर यांनी गुलाब पुष्प देऊन सर्वांचे सत्कार केले

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!