भुसावळ येथे लोकसंघर्ष मोर्चा चा अभिनव उपक्रम ….

कोरोना पती गमावलेल्या एकल महिलांच्या पुनर्वसनासाठी वात्सल्य समिती व लोकसंघर्ष मोर्चा कटिबद्ध..

भुसावळ प्रतिनिधी –

आज दिनांक 14 ऑक्टोबर 2021 गुरुवार रोजी दुपारी एक वाजता भुसावळ तहसील कचेरी येथे वात्सल्य समितीचे अध्यक्ष तहसीलदार श्री दीपक धीवरे यांच्या दालनात लोकसंघर्ष मोर्चा च्या नेत्या प्रतिभाताई शिंदे व यांनी अनेक मुद्दे मांडले (१ )धरणगाव तालुक्यात कोरोनामुळे पती मुलगा गमावलेल्या निराधार महिला व एक पालक वा दोन्ही पालक गमावलेल्या मुलांचा गाव निहाय सर्वे करावा ( २ )अशा निराधार महिलांना तत्काळ अन्नसुरक्षा योजनेचा लाभ निराधार पेन्शन योजना तहसील कचेरीवर कुटुंब सहाय्य योजने अंतर्गत वीस हजार रुपये तात्काळ देण्यात यावे (३) ज्या महिलांकडे आपल्या पतीच्या मृत्यूनंतर कागदपत्र उपलब्ध नसतील तर तत्काळ कॅम्प लावून दाखले व संबंधित प्रमाणपत्र उपलब्ध करून देण्यात यावे (४) एकल महिलांकडे एखादे कौशल्य असल्यास त्यांना संबंधित विभागाच्या योजना मिळवून देण्याची शिफारस असलेल्या समितीने करावे (5) समृद्ध गाव विकास योजना मनरेगा अंतर्गत योजनांचा लाभ देण्यात यावा (६)ज्या महिलांकडे शेती आहे त्यांना शेती पूरक उद्योगांना अनुदान व बिनव्याजी कर्ज मिळावे (७ )सुप्रीम कोर्टाच्या निकालाप्रमाणे सर्वांना 50 हजार रुपये अनुदान तात्काळ देण्यात यावे तालुक्यात एक पालक गमावलेल्या मुलांना तत्काळ बालसंगोपन अनुदान महिना 1250 रुपये देण्यात यावे व दोन्ही पालक गमावलेल्या मुलांना तत्काळ पाच लाख रुपयांची मदत देण्यात यावी आजच्या बैठकीत तहसीलदार श्री दीपक देवरे यांच्या सोबत ग्राम विकास अधिकारी लोकसंघर्ष मोर्चाच्या नेत्या प्रतिभा ताई शिंदे कार्यकर्ता सुप्रिया चव्हाण तेजस्विता जाधव यांच्यासह कोरोनामुळे विधवा झालेल्या एकल महिला व भुसावळ तालुक्यातील लोकसंघर्ष मोर्चा चे ज्येष्ठ नेते चंद्रकांत चौधरी दीपक काठे युवराज कुरकुरे लोकसंघर्ष मोर्चा वेल्हाळा येथील आकाश कुरकुरे हेमंत पाटील हितेश कोलते मिलिंद पाटील हे उपस्थित होते यावेळी तहसीलदारांनी गाव निहाय सर्वे आठ दिवसात पूर्ण करण्याचे व सर्वांना रेशनिंग व संजय गांधी निराधार योजनेचा लाभ देण्याचे आश्वासन देत पुढील दर पंधरा दिवसातुन एकदा मीटिंग घेण्याचे आश्वासन देत मीटिंग सर्वांचे आभार मानत संपन्न झाली याप्रसंगी याप्रसंगी भुसावळचे बी डि ओ सुधीर फेगडे व विविध योजनांचे प्रतिनिधी कर्मचारी यांनी लोकसंघर्ष मोर्चाच्या प्रतिभाताई शिंदे यांनी विचारलेल्या कार्य भागाची माहिती सांगितली मीटिंग खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली मीटिंग साठी मुक्ताईनगर बोदवड भुसावळ तालुक्यातील महिला पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!