वृक्षरोपण करणे जसे कार्य आहे तसे त्याचे संवर्धन संगोपण करणे हे आद्य कर्तव्य आहे…जिल्हाध्यक्ष तथा राज्य समन्वयक नाना पाटील

निसर्ग व सामाजिक पर्यावरण मंडळाची तालुका कार्यकारणी जाहीर.


तालुका अध्यक्ष गिरीष भंगाळे तर कार्याध्यक्ष अर्जून सोळूके सर
.

रावेर- निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळ (महाराष्ट्र) च्या वतीने आज नूतन तालुका कार्यकारणीची नियुक्ती व वृक्षारोपणाचा कार्यक्रम घेण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्ष सेवानिवृत्त मुख्याध्यापक तथा निसर्ग व सामाजिक पर्यावरण मंडळाचे राज्य सल्लागार.बी.आर.पाटील हे होते.
.यावेळी प्रमुख पाहुणे व मागदर्शक नाना शंकर पाटील(जिल्हाध्यक्ष- निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळ), मा. सुरेंद्र पाटील (राज्य सल्लागार), मा. नितीन महाजन (अध्यक्ष-मा़ध्य.शिक्षक संघ, रावेर) लाभले . मान्यवरांच्या हस्ते सर्वप्रथम वटवृक्षाच्या रोपाचे पूजन करण्यात आले . यावेळी मागदर्शन करताना नाना पाटील म्हणाले निस्वार्थ पोटी निसर्गाची पर्यावरणाची, वृक्षाची सेवा करा त्यावर प्रेम करा निसर्ग ,पर्यावरण , वृक्ष आपोआप तुमची स्वतःची ओळख निर्माण करेल, वृक्ष संवर्धन कार्यामुळेच तुम्ही आज ओळखता आहेत स्नेह देत आहे तसे आपणही करा स्वतःची ओळख निर्माण होईल
.

त्याचप्रमाणे वृक्ष लागवड जसे महत्त्वाचे आहे तसे वृक्षसंवर्धनाची जबाबदारी कर्तव्य समजून उचलावी असे आपल्या मार्गदर्शन करतांना नाना पाटील यांनी आवाहन केले. त्यानंतर राज्य सल्लगार बी आर पाटील सर जिल्हाध्यक्ष नाना पाटील यांच्या मार्गदर्शना खाली रावेर तालुका नूतन कार्यकारिणी जाहीर करून नियुक्तीपत्र मान्यवरांच्या हस्ते वितरित केले. यात – तालुका .अध्यक्ष गिरीश भंगाळे रोझोदे , उपाध्यक्ष सैयद वसीम सैयद अयुब खानापूर, उपाध्यक्षा सौ. अर्चना महाजन चिनावल, तालुका कार्याध्यक्ष अर्जुन सोळुंके रावेर, सचिव कपिल धांडे रोझोदे, खजिनदार काशिनाथ धांडे खानापूर, संघटक नितीन भोगे निंभोरा,कायदेशीर सल्लागार ॲड. निलेश महाजन सावखेडा, ॲड. सुधीर धांडे रोझोदे, सल्लागार नंदकिशोर पाटील सावदा, रावेर शहर अध्यक्ष सबाजखॉ तडवी रावेर, सदस्य अमोल राणे सावदा, प्रकाश महाजन सिंगनूर,संदिप महाजन वाघोदा,महम्मद तडवी रावेर, सौ. रूपाली नेमाडे चिनावल. अशाप्रकारे तालुका कार्यकारिणी जाहीर करण्यात आली.

प्रसंगी प्रमुख पाहूण्यांच्या हस्ते सौभाग्य नगर परिसरात वड,कडूलिंब, आवळा, शिसम, बहावा, पिंपड अशा एकूण २५ वृक्षांच्या रोपांची लागवड करण्यात आली. तसेच अंधत्व निवारण संशोधनासाठी व नेत्ररोग निवारणासाठी नेत्रदान संकल्प करण्यात आला.कार्यक्रमाचे प्रास्ताविक गिरीश भंगाळे यांनी तसेच सुत्रसंचालन अर्जुन सोळुंके यांनी तर आभार कपिल धांडे यांनी मानले कार्यक्रम यशस्वीतेसाठी नितीन नेमाडे, रमेश राठोड, एस. बी. राणे,सौ.रंजना सोळुंके,पंकज पाटील, सुयोग पाटील, राहुल पाटील, समाधान बोरसे, विपूल सोळुंके, वरद नेमाडे यांनी परिश्रम घेतले.

प्रत्येक बातमी आता आपल्या स्मार्टफोनवर !
*शोषित, पीडित, वंचितांचा बुलंद आवाज दैनिक “महाराष्ट्र सारथी”
आपण आपल्या परिसरातील बातमी
80875 77520 या व्हाट्सॲप क्रमांकावर पाठवू शकता !
आमच्या व्हाट्सअप ग्रुपला आत्ताच जॉईन 👇🏻व्हा..

https://chat.whatsapp.com/EL7IYodUmoCJKHwMGVJ13r

नाना पाटील सर.
दैनिक महाराष्ट्र सारथी
जळगाव जिल्हा प्रतिनिधी
80875 77520

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!