नाहाटा महाविद्यालयात वाणिज्य विभागातर्फे विद्यार्थ्यांसाठी तीन दिवसीय ऑनलाइन कार्यक्रमाचे आयोजन….

दैनिक महाराष्ट्र सारथी भुसावळ प्रतिनिधी –

भुसावळ कला विज्ञान आणि पु. ओ. नाहाटा वाणिज्य महाविद्यालयात दिनांक ४ ऑगस्ट २०२१ ते ६ ऑगस्ट २०२१ या कालावधीत वाणिज्य व व्यवस्थापन शाखेतर्फे विद्यार्थी हितोपयोगी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.


दि. ४ ऑगस्ट २०२१ रोजी डॉ. पराग नारखेडे यांनी “कॉविड -19 व मानव संसाधन व्यवस्थापन समोरील आव्हाने” या विषयावर मार्गदर्शन करताना कॉविड -19 च्या जागतिक महामारी मुळे उद्योग व व्यवसायात काम करणाऱ्या कामगारांचे व्यवस्थापन करण्याची समस्या उद्योगापुढील आज मोठे आव्हान असल्याचे सांगून त्याच प्रमाणे कामगारांचे रोजगार गेल्यामुळे आज कामगार म्हणजे मानव संसाधना समोर सुद्धा अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. त्यासंबंधी अनेक पैलूबाबत डॉक्टर नारखेडे यांनी आपल्या व्याख्यानात प्रतिपादन केले. सदर कार्यक्रमाच्या अध्यक्ष महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. सौ. मिनाक्षी वायकोळे होत्या. विद्यार्थ्यांनी आपले करिअर निवडतांना काळानुरूप कौशल्ये व तंत्रज्ञानाचा वापर करून ज्ञान आत्मसात केले पाहिजे असे त्यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात सांगितले.


दिनांक ५ ऑगस्ट २०२१ रोजी संचालक गोदावरी इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट डॉ. प्रशांत वारके यांनी “ ई-कॉमर्स वाढीची संधी आणि करिअर” या विषयावर विद्यार्थ्यांना ऑनलाइन मार्गदर्शन करताना आजच्या बदललेल्या परिस्थितीत ई कॉमर्स मध्ये करिअर करताना कशा प्रकारच्या संधी आहेत याविषयी अत्यंत तपशीलवार माहिती दिली सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष उपप्राचार्य डॉ. एस. व्ही. पाटील होते. त्यांनी सुद्धा ई-कॉमर्स मध्ये नवीन होतकरू विद्यार्थ्यांना अनेक संधी असल्याने नोकरी मागे न लागता एखाद्या व्यवसाय निवडण्याचे आवाहन केले. असे अध्यक्षीय भाषणात मनोगत व्यक्त केले.


दिनांक ७ ऑगस्ट २०२१ रोजी मा. सुनील पाटील, व्यवस्थापक जिल्हा उद्योग केंद्र, बुलढाणा. यांनी विद्यार्थ्यांना “ नवउद्योजकांना उद्योग व्यवसाय करण्यासाठी शासन योजना” या विषयावर ऑनलाईन मार्गदर्शन करताना व उद्योजकांसाठी जिल्हा उद्योग केंद्राकडून असलेले प्रशिक्षण, कोणत्या व्यवसायासाठी कशा प्रकारची आर्थिक मदत मिळते, प्रधानमंत्री रोजगार योजने अंतर्गत मिळणारे लाभ, राज्य सरकारच्या योजने अंतर्गत मिळणारे लाभ याविषयी सविस्तर माहिती दिली. सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष उपप्राचार्य डॉ. ए. डी. गोस्वामी होते त्यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात विद्यार्थ्यांनी नवनवीन व्यवसायिक क्षेत्रात पदार्पण करावे. रोजगाराची दुसऱ्यांकडून अपेक्षा न करता तुम्ही दुसऱ्यांना रोजगार द्यावा असा स्वयमरोजगार उद्योग करण्याविषयी मार्गदर्शन केले.
वरील कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सौ. मीनाक्षी वायकोळे, उपप्राचार्य प्रा. डॉ. एस व्ही. पाटील, उपप्राचार्य प्रा. डॉ. ए. डी गोस्वामी, उपप्राचार्य प्रा. डॉ. बी. एच. ब-हाटे, उपप्राचार्य प्रा.डॉ. एन. ई. भंगाळे यांचे मार्गदर्शन लाभले.


सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक अनुक्रमे प्रा. डॉ. ममता पाटील, प्रा. डॉ. एन. ई. भंगाळे, प्रा. डॉ. पी. के. पाटील यांनी केले, पाहुण्यांचा परिचय प्रा. सपना कोल्हे तर आभार प्रदर्शनाचे काम प्रा. स्मिता बेंडाळे यांनी केले सदर कार्यक्रमासाठी प्रा. खीलेश पाटील, प्रा. हर्षल पाटील यांनी मोलाचे सहकार्य केले. तसेच डॉ. रश्मी शर्मा प्रा. के. पी. पाटील, प्रा. वर्षा पाटील, प्रा. भूषण चौधरी, प्रा. स्वाती शेळके, प्रा.हेमंत सावकारे यांनी सहकार्य केले.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!