12 डिसेंबरला ऊसाच्या फडात जाणार आणि ऊसतोड कामगारांशी संवाद साधणार – पंकजा मुंडे

बीड,

सावरगाव घाट येथील भगवान भक्तीगडावर पंकजा मुंडे यांचा दसरा मेळावा पार पडला आहे. या दसरा मेळाव्याच्या सुरुवातीला खासदार प्रीतम मुंडे यांच्या भाषणाला सुरुवात झाली. हा मेळावा कुठल्याही पक्षाचा मेळावा नाहीये असं सर्वप्रथम खासदार प्रीतम मुंडे यांनी म्हटलं. तसेच आपला आवाज हा केवळ बीड जिल्ह्यापुरता नाही तर दिल्लीपर्यंत असल्याचंही त्यांनी म्हटलं. यानंतर पंकजा मुंडे यांनी आपल्या खास शैलीत भाषण करुन विविध मुद्द्यांवर भाष्य केलं.

पंकजा ताई घरात बसल्या आहेत म्हणत जे खूष आहेत त्यांनी माझा दौरा लिहून घ्या. मी 17, 18,19 दिल्लीला आहे. त्यानंतर 23, 24, 25 तारखेला मुंबई, नवी मुंबई आणि पुण्याला आहे. नंतर 29, 30, 31 तारखेला नाशिकच्या दौर्‍यावर आहे. 12 डिसेंबरला ऊसाच्या फडात जाऊन ऊसतोड कामगारांच्यासोबत मी गावागावात जाऊन संवाद साधणार आहे असं पंकजा मुंडे यांनी म्हटलं.

कोरोना होता, लोकांना कोरोनाच्या संकटात औषध, बेड मिळत नव्हते. अशी नागरिकांची अवस्था असताना मी दौरे करायला पाहिजे होते का? मी दौरे करुन तुमचं आरोग्य धोक्यात टाकायचं होतं का? तमुची काळजी वाटली म्हणून घरात बसली नाही तर कोविड सेंटर सुरू केलं. कोरोना संकटात नागरिकांना बेड, औषधे उपलब्ध करुन दिली. अतिवृष्टी झाली तेव्हा दौरा केला आणि दसर्‍याच्या आधी पॅकेज जाहीर करण्याचं म्हटलं, केलं की नाही दसर्‍यापूर्वी पॅकेज जाहीर. केवळ पॅकेज जाहीर करुन चालणार नाही तर शेतकर्‍यांच्या खात्यात पैसे जमा झाले पाहिजेत. शेतकर्‍यांना मदत मिळाली का? तेवढी नरेंद्र मोदींची मदत येत आहे. राज्य सरकारची आली का मदत? पालकमंत्र्यांची मदत आली का? हे असं आहे त्यामुळे यांना काही बोललं की राग येतो. तुम्ही मंत्री झाल्यावर आम्ही कुणाला बोलणार? आम्ही सरकारकडेच मागणार ना? तुम्ही विरोधी पक्षात असताना किती लोकांना त्रास द्यायचे नुसत्या धमक्या… असं करेन अन् तसं करेन.. आता काय आहे बीड जिल्ह्याची अवस्था. अरे आपलं मंत्रिपद यांनी भाड्याने दिलं आहे, यांचं काही चालत नाही अशी परिस्थिती आहे असं म्हणत पंकजा मुंडेंनी धनंजय मुंडेंवर घणाघात केला आहे.

सत्ता नाही म्हणून नेळावा नको म्हणत होते. पण या मेळाव्याने कधी सत्ता पाहिली आहे का? सत्ता नाही म्हणून मेळावा नको बोलत होते. मी म्हटलं मेळाव्याची आपली परंपरा आहे. कुणी म्हटलं अतिवृष्टी झाली कुणी म्हटलं कोरना आहे. मी म्हटलं अशाच लोकांना ऊर्जा देण्यासाठी हा मेळावा आहे असंही पंकजा मुंडे यांनी म्हटलं.

पंकजा मुंडेंनी म्हटलं, आजचा कार्यक्रम खूप देखणा आहे. दसर्‍याची परंपरा कायम ठेवण्यासाठी येथे आलात, ही परंपरा कायम ठेवण्याचं श्रेय तुमचंच आहे. देशात असा सोहळा होत नसेल. तुम्ही सर्वांनी मला भरभरून प्रेम दिलं, तुमच्यासमोर मी नतमस्तक होते. या मंचावर सर्व विचारांचे लोक आहेत. लोकांना ऊर्जा देण्यासाठी हा मेळावा आहे. मला वाटलं मेळाव्याला कुणाची दृष्ट लागली. मी तुमच्या सर्वांची दृष्ट काढली.

मराठा आणि ओबीसी समाजासाठी आवाज उठवणार – पंकजा मुंडे

12 डिसेंबरला उसतोड कामगारांशी संवाद साधणार – पंकजा मुंडे

मी घरात बसले अशी टीका करणार्‍यांनी माझा दौरा पहा – पंकजा मुंडे

आपलं मंत्रिपद यांनी भाड्याने दिलं – पंकजा मुंडे

ज्या व्यक्तीवर बोलून भगवान बाबांची मान खाली जाईल अशा कुठल्याही व्यक्तीचा मला उल्लेख करायता नाहीये – पंकजा मुंडे

कुठल्याही नेत्याती मी चमचेगिरी करत नाही – पंकजा मुंडे

तुमच्यासमोर मी नतमस्तक होते – पंकजा मुंडे

तुम्ही सर्वांनी मला भरभरून प्रेम दिलं – पंकजा मुंडे

असा रांगडा सोहळा देशात होत नसेल – पंकजा मुंडे

देशात असा सोहळा होत नसेल – पंकजा मुंडे

ही परंपरा कायम ठेवण्याचं श्रेय तुमचंच – पंकजा मुंडे

दसर्‍याची परंपरा कायम ठेवण्यासाठी येथे आलात – पंकजा मुंडे

आजचा कार्यक्रम खूप देखणा आहे – पंकजा मुंडे

मी कुणाकडेही तिकीट मागायला जाणार नाहीये – महादेव जानकर

गोपीनाथ मुंडे नसते तर जानकर मेंढरं राखत असते – महादेव जानकर

आरशापुढे नक्कल म्हणजे नेता नाही – महादेव जानकर

आम्ही गद्दार, लाचार होणार नाही – महादेव जानकर

सत्तेच्या पाठी आम्ही भीक मागत नाही – महादेव जानकर

नेता विकत घेता येत नाही, नेतेपद हे रक्तात असावं लागतं – रासप नेते महादेव जानकर

प्रत्येक वंचितासाठी हा मेळावा आहे – खासदार प्रीतम मुंडे

शंका असलेल्यांनी जनसमुदाय पाहा – खासदार प्रीतम मुंडे

आपला आवाज दिल्लीपर्यंत पोहोचवा – खासदार प्रीतम मुंडे

आपला मेळावा कुठल्याही पक्षाचा मेळावा नाही – खासदार प्रीतम मुंडे

मेळाव्यात खासदार प्रीतम मुंडे यांच्या भाषणाला सुरुवात

राष्ट्रसंत भगवानबाबा यांचे जन्मस्थान असलेल्या पाटोदा तालुक्यातील सावरगाव घाट येथील भगवान भक्तिगडावर दसरा मेळावा पार पडला. लोकनेते स्व.गोपीनाथराव मुंडे यांनी दसरा मेळाव्याची परंपरा सुरू केली होती. ती परंपरा पुढे भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनी कायम ठेवली आहे. मागील चार वर्षांपासून संत भगवानबाबा यांचे जन्मस्थान असलेल्या सावरगाव येथे दसरा मेळावा घेण्यात येत आहे. मागच्या वर्षी कोरोना संकटा मुळे दसरा मेळावा ऑॅनलाईन पद्धतीने घेण्यात आला होता. यंदाही कोरोनाचे सावट असल्याने हा मेळावा कसा होणार? याकडे लक्ष लागले होते. पण पोलिसांनी या मेळाव्याला कोरोना प्रतिबंधक नियम, अटी घालून परवानगी दिली.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!