हॅप्पी टू हेल्प फाउंडेशन राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानीत!

सोलापूर येथे भव्यदिव्य पुरस्कार सोहळ्यात हॅप्पी टू हेल्प फाऊंडेशन चे संस्थापक अध्यक्ष शेख अब्दुल रहीम सन्मानित…

औरंगाबाद-(प्रतिनिधी)

सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रात अनेक वर्षांपासून हॅप्पी टू हेल्प फाऊंडेशन उत्तमरित्या कामगिरी बजावत आहे. राष्ट्रीय कर्तव्य काम असो सामाजिक काम किंवा शैक्षणिक कार्य असो, कार्यात सदेव अग्रेसर असणारी महाराष्ट्र राज्यातील अग्रनिय सामाजिक संस्था हॅप्पी टू हेल्प फाऊंडेशन ला “राष्ट्रीय स्नेहबंध आदर्श सामाजिक संस्था सन्मान 2020” पुरस्कार स्वर्गीय हरिश्चंद्र गायकवाड बहुउद्देशीय समाजसेवी संस्था, भोसे ता.पंढरपूर जि.सोलापूर च्या वतीने जाहीर करण्यात आले होते परंतु कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हा सन्मान सोहळा अनेकदा रद्द करण्यात आले होते परंतु दिनांक 17 ऑक्टोबर 21 रविवारी रोजी सोलापूर येथे डॉ.फडकुळे सभागृह मध्ये शानदार दिमाखात हा सोहळा पार पडला. औरंगाबाद व महाराष्ट्र राज्यातील लोकप्रिय सामाजिक संस्था हॅप्पी टू हेल्प फाऊंडेशन ला हा राष्ट्रीय सन्मान मिळाल्याने संस्थेचे संस्थापक अध्यक्ष शेख अब्दुल रहीम सर आणि औरंगाबाद जिल्हाध्यक्ष सय्यद ताजीमोद्दीन सर यांनी स्वतः या भव्यदिव्य कार्यक्रमास उपस्थित राहून पुरस्कार स्वीकारले.पंढरपूर स्वर्गीय हरिश्चंद्र गायकवाड बहुउद्देशीय समाजसेवी संस्थेने हॅप्पी टू हेल्प फाऊंडेशनच्या कार्याची दखल घेत राष्ट्रीय पुरस्कारासाठी निवड केली होती. सोलापूर येथे अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत हा पुरस्कार सोहळा पार पडला. हॅप्पी टू हेल्प फाऊंडेशन ला राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आल्याने व निवडीचे श्रेय संपूर्ण टीम च्या मेहनती आणि वर्षभराच्या उपक्रमाला जाते असे संस्थापक अध्यक्ष शेख अब्दुल रहीम सरांनी आमच्या प्रतिनिधी ला बोलताना सांगितले आहे. या पुरस्कार मिळाल्याबद्दल सर्व स्तरातून हॅप्पी टू हेल्प फाऊंडेशन टीम चा कौतुक आणि अभिनंदन होत आहे.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!