प्रेमासाठी काहीही! प्रियकराला भेटण्यासाठी तिने केला ’असा’ प्लॅन; नागरिकांच्या संशयाने फुटले बिंग

औरंगाबाद,

दोन वर्षांपासून प्रियकराला त्याच्या घरातील लोक भेटू देत नसल्याने एका मुलीने सर्व्हे करण्याच्या बहाण्याने दोन मैत्रिसोबत घेऊन प्रियकराची सोसायटी गाठली. मात्र, गेल्या तीन दिवसांपासून सोसायटीत अनोळखी तीन मुली परवानगीविनाच फिरत असल्याने नागरिकांनी त्यांना पकडले. यावेळी नागरिकांनी दामिनी पथकाला बोलवल्याने प्रियसीचे बिंब फुटले.

दोन मैत्रीणीला घेऊन रचना प्लॅन –

एका फार्मसी कॉलेजमध्ये शिकणार्‍या एका मुलीचे एएस क्लब परिसरात राहणार्‍या एका मुलासोबत प्रेमसंबंध होते. मात्र, याची माहिती मुलाच्या घरच्यांना लागली. त्यामुळे त्याच्या घरच्यांनी त्याच्याकडील मोबाईल काढून घेतला. तसेच त्यांना दोन वर्षांपासून घराबाहेरही जाऊ दिले नाही. त्यामुळे अनेक दिवसांपासून दोघांची भेट होऊ शकत नव्हती. दरम्यान, नागपूर येथून एक मुलगी शिकण्यासाठी औरंगबाद येथे आली असता. तिची या मुली्शी ओळख झाली. ओळखीचे रुपांतर मैत्रीत झाले. सोबत अजून एका मैत्रीणीला घेऊन तिघींनी मुलाच्या सोसायटीमध्ये जाऊन टेरेसवरून मुलाचे घर शोधण्याचा प्रयत्न केला. मात्र नागरिकांना संशय आल्याने त्यांनी या मुलींकडे विचारणा केली, तसेच या माहिती पोलिसांनी दिली. पोलिसांच्या दामिनी पथकाने घटनास्थळी दाखल होत मुलींनी ताब्यात घेतले. दरम्यान, महिला पोलिसांनी मुलींना विश्वासात घेऊन तिच्याकडे विचारणा केली असता, तिचे सर्व हकिकत सांगतील. त्यानंतर नागरिकांचीही कोणतीच तक्रार नसल्याने पोलिसांनी तिन्ही मुलींना नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आले.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!