केंद्रीय तपास यंत्रणांची आता कीव यायला लागली – बाळासाहेब थोरात

ठाणे,

दर आठवड्याला सरकार पडेल या आकांक्षेने भाजपामधील अनेक लोक नवीन कपडे शिवतात. पण त्यांना काही मुहूर्त लागत नाही. एवढेच काय तर इतर पक्षातील लोक भाजपामध्ये गेले तेव्हा त्यांनी जाहीर वक्तव्य केले, की आम्हाला आता सुखाची झोप लागते. कारण आम्हाला कोणत्याही कारवाईचे भय नाही असे हर्षवर्धन पाटील यांचे नाव घेऊन महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी थेट भाजपावर निशाणा साधला आहे. पक्षीय बैठकीकरता आले असता पत्रकारांशी बोलताना त्यांनी भाजपावर सडकून टीका केली.

’हा डाव भाजपावरच उलटणार’

केंद्रीय तपास यंत्रणांना हाताशी धरून महाविकास आघाडीचे सरकार कसे पडता येईल, याकरता भाजपा रोज नवनवीन युक्त्या लढवत आहे. तर केंद्रीय तपास यंत्रणांचा डाव आता भाजपावरच उलटणार आहे, असे मंत्री छगन भुजबळ यांनी केलेल्या वक्तव्यावर महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनीदेखील भाजपावर निशाणा साधला आहे.

’इंधन दरवाढ करणारे कुठे लपून बसले?’

इंधन दरवाढीबाबत त्यांनी पुन्हा एकदा केंद्र सरकारवर टीका केली आहे. इंधन दरवाढ झाल्यामुळे वाढणारी महागाई सामान्य जनतेच्या आवाक्याबाहेर गेली आहे. सामान्य जनतेचे जगणे असह्य झाले आहे. त्यामुळे इंधन दरवाढीवर केंद्र सरकारने नियंत्रण आणणे गरजेचे आहे, असे ते म्हणाले.

’भाजपा विरोधकांनी एकत्र येणे गरजेचे’

राज्यात महानगरपालिका निवडणुकांमध्ये महाविकास आघाडी म्हणून शिवसेना, राष्ट्रवादी काँग-ेस आणि काँग-ेस एकत्रित निवडणूक लढवणार का, या पत्रकारांच्या प्रश्नावर बाळासाहेब थोरात यांनी सूचक वक्तव्य केले असून स्थानिक पातळीवर जरी या तिन्ही पक्षांतील कार्यकर्ते, पदाधिकार्‍यांमध्ये दिलजमाई होत नसली तरी निवडणुकीच्या वेळी आम्ही सर्व एकत्र येऊ आणि एकत्रच निवडणूक लढवू, असे ते म्हणाले. भाजपाला सर्व सत्तेतून बाहेर ठेवायचे असेल तर भाजपा विरोधक सर्व पक्षांनी एकत्र येणे गरजेचे आहे, याचा पुनरुच्चार त्यांनी केला.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!