मावळतीच्या सुर्यकिरणांनी कोकणातील पिवळ्या सोन्याला अधिक झळाळी, मनमोहून टाकणारी भाताचे वाफे!

कल्याण (प्रतिनिधी) –

निसर्ग सौंदर्याने नटलेल्या कोकणात अधिक भर घातली आहे ती म्हणजे सध्या कापणीला आलेल्या भात पिकाने,पिवळ्या धमक रंगाच्या या पिकावर मावळतीची सुर्यकिरण पडल्याने ही शेते अधिक मनमोहक दिसत आहेत,त्यामुळे संपूर्ण कोकण या पिवळ्या सोन्याने नटलेले आहे.

कोकण म्हटलं की निळाभोर अथांग समुद्र, हिरवेगार दाट झाडी, आंबा, फणस, काजू, काळीभोर करवंद, जांभूळ असे काहीसे चित्र आपल्या समोर उभे राहते, थकलेल्या मनाला टवटवीत, प्रसन्न करायचे असेल तर वर्षांतून एकदा तरी कोकणा जायलाच हवे, असे जाणकारांचे म्हणने आहे, व ते खरेही आहे, गर्द दाट झाडी, मधेच दिसणारा व लगेच गायब होणारा घाट रस्ता, हिरवेगार डोंगर, टेकड्या, यातून फेसाळत वाहणाऱ्या नद्या, झरे,धबधबे,असे निसर्ग सोंदर्य कोकणा दिसते.परंतु सध्या यामध्ये भर पडली आहे ती म्हणजे, छोट्या छोट्या भात पिकांची!

तसे पाहिले तर कोकणातील मुख्य पिक भात हेच आहे, ते शेतकऱ्यांचे सोनंच आहे,पण येथे बहुतांश भात शेती ही डोंगर, टेकड्या वर,झरे,यांच्या आजूबाजूला आहे, छोट्या वाफ्यात भात पिके घेतली जातात. क्वचित गावात भातशेती ही सपाटीवर दिसून येते.

कोकणातील मलकापूर, पन्हाळा, बांबवडे,दापोली, मंडणगड, पाचगणी, वाई,महाबळेश्वर, महाड या  तालुक्यात डोंगर, टेकड्या वर भात शेती केली जाते,याला वाफा,चिरा,तूकडा, असे म्हणतात. तसेच काही भागात सिंचनाची सोय उपलब्ध झाल्या ने तेथे ऊस हे नगदी पिके घेतली जातात.सध्या येथे भाताच्या शेतीने मन आकर्षित केले आहे. हे पिक कापणीला आले आहे.घरगुती च कापणीला सुरुवात केली आहे. त्यामुळे पिवळे धमक झाले आहे.या पिकाचे वैशिष्ट्य म्हणजे, प्रांरभी लावणीच्या नंतर काहीसे,पोपटी, मध्यंतरी हिरवेगार व शेवटी पिवळे धमक असे रंग बदलते,त्यामुळे हे खूपच विलोभनीय दिसते. अशा या पिवळ्या भात पिकावर मावळणा-या सुर्यकिरणांची झालर पडल्याने हे अधिकच सुंदर व मनमोहक दिसत आहे, कणेरी, वाघवे,देवठाणे,कोतोली,कळे,बाजारभोगाव, विशाळगड, पन्हाळा, बांबवडे,मलकापूर, चिखली, धनगरवाडी,घुंगूर, इंजोले,राकक्षी,माले,मानेवाडी, आदी गावात दिसून येत आहे.

या परिसरात कापणी केले भात मळणी, करण्यासाठी व भाताचा पेंडा/पिंजार ठेवायला ते सुखवायला जागा नसल्याने ते सर्रास रस्त्यावर टाकले जाते. यामुळे वाहतूक व्यवस्थेत अडचणी निर्माण होत आहेत. असे असले तरी कोकणातल्या सौंदर्यात भर घालणा-या बळीराजाच्या या पिवळ्या सोन्याच्या दृश्याने समाधान मोठे मिळत आहे.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!