रक्तबंबाळ झाला तरी देखील सतीश कुमार नडला आणि प्रतिस्पर्धीला ’फोडला’

टोकियो

29 जुलै

भारतीय पुरूष बॉक्सर सतीश कुमारचे ऑॅलिम्पिकधील पदार्पण दमदार राहिले. सतीशने 91 किलो वजनी गटात जमैकाच्या रिकार्डो ब-ाउन याचा पराभव केला. या विजयासह सतीश उपांत्यपूर्व फेरीत पोहोचला आहे. दोन्ही खेळाडूचे हे पहिलेच ऑॅलिम्पिक असून यात सतीशने ब-ाउनचा 4-1 ने पराभव केला.

दोन वेळा आशियाई चॅम्पियनशीप स्पर्धेत सतीशने कांस्य पदक जिंकले आहे. त्याने आजच्या सामन्यात ब-ाउनच्या खराब फुटवर्कचा फायदा घेतला. या सामन्यात सतीशच्या कपाळाला दुखापत देखील झाली. यात त्याच्या जखमेतून रक्त वाहू लागलं होतं. तरी देखील त्याने प्रतिस्पर्धी खेळाडूला पराभूत केलं.

राष्ट्रकूल स्पर्धा 2018 चा रौप्य पदक विजेता सतीश कुमारने डाव्या हाताने पंच मारत, ब-ाउनला चूका करण्यास भाग पाडलं. ब-ाउन एकही दमदार पंच मारू शकला नाही. दरम्यान, जमैकाकडून 1996 नंतर ऑॅलिम्पिकसाठी पात्र ठरलेला ब-ाउन पहिला बॉक्सर आहे. तो उद्धाटन सोहळ्यात जमैकाचा ध्वजवाहक होता.

उपांत्यपूर्व फेरीत सतीशसमोर कडवं आव्हान

आता उपांत्यपूर्व फेरीत सतीश कुमारचा सामना उज्बेकिस्तानच्या बखोदिर जालोलोव याच्याशी होणार आहे. बखोदिर हा यंदाचा विश्वविजेता आणि आशियाई चॅम्पियन आहे. बखोदिर याने अजरबैजानच्या मोहम्मद अब्दुल्लायेव याचा 5-0 ने पराभव करत उपांत्यपूर्व फेरी गाठली आहे. सतीशने जर बखोदिर याचा पराभव केला तर त्याचे ऑॅलिम्पिकमधील पदक निश्चित होईल.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!