शरथ कमल आणि मनु भाकरवर असणार नजरा, पाहा 27 जुलैचं संपूर्ण शेड्युल

टोकियो

26 जुलै

टोकियो ऑॅलिम्पिकमध्ये आजचा दिवस भारतासाठी काही खास नव्हता. भारताची स्टार टेबल टेनिसपटू मानिका बत्रा आणि सुतीर्थ मुखर्जी या महिला एकेरीत सरळ गेममध्ये पराभूत झाल्या. मात्र शरथ कमल तिसर्‍या फेरीत पोहोचला आणि आता शरथकडूनच पदक मिळण्याची एकमेव आशा आहे. भारतीय खेळाडूंनी अन्य खेळांमध्येही निराश केले. पाचव्या दिवशी प्रत्येकाला शरथ कमल आणि मनु भाकरकडून पदकाची आशा असेल. भारतीय वेळेनुसार मंगळवारी (27 जुलै) टोकियो ऑॅलिम्पिकमधील भारताचे वेळापत्रक जाणून घेऊया.

नेमबाजी

सकाळी 5.30 वाजता एअर पिस्टल मिश्र टीम क्वॉलिफिकेशन पहिली फेरी सुरु होईल. यात सौरभ चौधरी आणि मनु भाकर, यशस्विनी देसवाल आणि अभिषेक वर्मा यांचा समावेश असेल.

तर सकाळी 10 वाजता एअर रायफल मिश्र टीम क्वॉलिफिकेशन पहिली फेरी सुरु होईल. यात इलाव्हेनिल वलारिवन आणि दिव्यांशसिंग पंवार, अंजुम मुद्गिल आणि दीपक कुमार हे खेळतील

टेबल टेनिस

अचंता शरथ कमल विरुद्ध मा लाँग (चीन), पुरुष एकेरीची तिसरी फेरी, सकाळी 8:30 वाजता सुरु होईल.

बॉक्सिंग

लवलीना बोरगोहेन विरुद्ध एपेटस नेडिन, महिला वेल्टरवेट राऊंड ऑॅफ 16, सकाळी 10 वाजून 57 मिनिटांनी सुरु होईल.

बॅडमिंटन

सात्विक साईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी विरुद्ध बेन लेन आणि सीन वेंडी (बि-टन), पुरुष युगल ग-ुप ए सामना, सकाळी 8.30 वाजता सुरु होईल.

हॉकी

भारत विरुद्ध स्पेन, पुरुषांचा )पूल अ) सामना सकाळी 6.30 वाजता सुरु होईल.

सेलिंग

नेत्रा कुमानन, महिला लेझर रेडियल, सकाळी 8.35 वाजता, विष्णू सरवनन, पुरुष लेसर, सकाळी 8.45 वाजता. केसी गणपती आणि वरुण ठक्कर, पुरुष स्किफ 49 ईआर, सकाळी 11.20 वाजता.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!