पाकिस्तानच्या विरुध्द टि-20 मालिकेसाठी मोर्गनचे इंग्लंड संघात पुनर्गमन

लंडन प्रतिनिधी

14जुलै

पाकिस्तान विरुध्द खेळण्यात येणार्‍या टि-20 मालिकेसाठी इंग्लंडच्या एकदिवशीय संघाचा कर्णधार इयोन मोर्गनसह नऊ खेळाडूंची इंग्लंडच्या संघात वापसी झाली आहे हे नऊ खेळाडू श्रीलंकेच्या विरुध्द खेळण्यात आलेल्या टि-20 मालिकेनंतर संघात कोरोना रुग्ण समोर आल्याच्या कारणामुळे आयसोलेशनमध्ये होेते. श्रीलंकेच्या विरुध्द खेळण्यात आलेल्या मालिकेच्या दरम्यान जखमी झालेला जोस बटलरला या टि-20 मालिकेसाठी संघात सामिल केले गेले आहे.

क्रिस सिल्वरवुड ब-ेकवर गेल्याच्या कारणामुळे पॉल कॉलिंगवुड संघाचा मुख्य प्रशिक्षक असेल. साकिब महमूद, लुईस ग-ेगारी आणि मॅट पार्किसनला एकदिवशीय सामन्यांच्या मालिकेतील त्यांच्या प्रदर्शनाला पाहता टि-20 संघात सामिल केले गेले आहे.

वेगवान गोलंंदाज महमूदने नुकतेच पाकिस्तानच्या विरुध्द तीन सामन्यांच्या एकदिवशीय मालिकेत 13.66 च्या सरासरीने नऊ गडी बाद केले होते याच कारणामुळे त्याला प्लेअर ऑफ द सीरीजचा पुरस्कार मिळाला होता.

बेन स्टोक्सच्या कर्णधारीखाली इंग्लंडने पाकिस्तानला 3-0 ने एकदिवशीय सामन्यांच्या मालिकेत पराभूत करुन क्लीन स्वीप केले होते. दोनीही संंघात आता 16 जुलै पासून टि-20 मालिका खेळली जाणार आहे.

इंग्लंडचा टि-20 संघ – इयोन मोर्गन (कर्णधार), मोईन अली, जॉनी बेयरस्टो, जॅस बॉल, टॉम बेंटॉन, जोस बटलर, टॉम करेन, लुईस ग-ेगोरी, क्रिस जॉर्डन, लियाम लिविंगस्टोन, साकिब महमूद, डेव्हिड मलान, मॅट पार्किंसन,. आदिल राशिद, जेसन रॉय आणि डेव्हिड विली.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!