शेतकर्‍यांची हत्या करण्याचं पाप आणि महागाईचे श्रेय भाजपलाच; शरद पवार यांनी सरकारला सुनावलं

सोलापूर,

उत्तर प्रदेशमधल्या लखीमपूर खेरीमध्ये झालेल्या हिंसाचारात एकूण 8 जणांचा मृत्यू झाला. यात शेतकरीही होते. या मुद्द्यावरून आता राष्ट्रवादी काँग-ेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केंद्र सरकारला चांगल्याच सुनावले आहे. या देशाच्या रेल्वेचे खासगीकरण करून ते विकण्याचं काम आजचे सत्ताधारी करत आहेत. सत्तेत असलेले लोक सत्तेचा गैरवापर करत आहेत. महागाईमुळे सामान्य माणसाला संसार करणं अवघड, त्याच श्रेय भाजपलाच जात आहे, असा हल्लाबोल पवार यांनी यावेळी केला.

सामान्य लोकांसाठी वेळ प्रसंगी रस्त्यावर उतरु. शेतकर्‍यांच्या अंगावर गाड्या घातल्या त्यात लोक मेले. तुमच्या हातात लोकांनी सत्ता दिली, तुम्ही लोकांच्या अंगावर गाड्या घालून त्यांच्या हत्या करण्याचं पाप केलं. शेतकर्‍याच्या अंगावर गाड्या घालणार्‍या सरकारच्या विरोधात 11 तारखेला महाराष्ट्र बंद करायचे आहे. महाराष्ट्र बंद करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले. बर्‍याच दिवसांनी ते सोलापुरात दाखल झालेत. त्यावेळी ते बोलत होते.

कोरोनानंतर अनेकांचा आत्मविश्वास वाढवण्याची गरज होती. विधानसभा निवडणुकीच्या आल्यांनातर पळापळ झाली. अनेक जण पक्ष सोडून गेले. पळपुटे विरुद्ध संघर्ष करण्याची घोषणा सोलापुरात झाली. भाजप येणार म्हणत होते, मात्र उद्धव ठाकरे, अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली सरकार आहे, याचे श्रेय तुमचे आहे, असे ते यावेळी म्हणाले.

भाजप सोडून इतर पक्षाचे एकजूट करण्याचा प्रयत्न करू, मात्र त्यात राष्ट्रवादीचा सन्मान झाला पाहिजे. मला सोलापुरला जुने दिवस आणायचे आहेत. मला सोलापुरला सोन्याचे दिवस दाखवायचेत आहेत, असे शरद पवार यांनी सांगिते. सोलापुरातील राष्ट्रवादीतील अंतर्गत वाद मिटविण्यासाठी त्यांनी हे भाष्य केले. त्यामुळे सगळ्यांनाच आता कामाला लागण्याचा अप्रत्यक्ष सल्ला दिला आहे.

अजित पवार यांच्याकडे पाहुणे आलेत!

पवार यांनी आयकर विभागाकडून टाकण्यात येणार्‍या धाडीवरही भाष्य केले. अजित पवार यांच्याकडे काल काही पाहुणे येऊन गेले. मला निवडणुकी आधी ईडीची नोटीस आली. त्यानंतर पुढे काय झाले ते तुम्हाला माहित आहे.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!