हृदयद्रावक ! आठवड्याभरापूर्वी भावाचं हृदयविकाराने निधन अन् आज बैलाचा पिता-पुत्रावर हल्ला, वडिलांचा जागीच मृत्यू

सिंधुदुर्ग,

पाळीव बैलाने पिता-पुत्रावर हल्ला केल्याची घटना समोर आली आहे. बैलाने केलेल्या या हल्ल्यात वडिलांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर मुलगा गंभीर जखमी झाला आहे. सिंधुदुर्गातील रांगणा-तुळसुली येथे ही घटना घडली आहे. आपल्या मालकीच्या पाळीव बैलाला पाणी पाजण्यासाठी घेऊन गेले असता बैलाने अचानक या पितापुत्रांवर हल्ला केला. यात वडील विलास शेट्ये यांचा जागीच मृत्यू झाला आहे.

तर मुलगा प्रमोद शेट्ये (28) यास गंभीर दुखापत झाली आहे. प्रमोद शेट्ये याला कुडाळ येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. आठवड्याभरापूर्वीच विलास शेट्ये यांच्या मोठ्या भावाचा हृदयविकाराच्या तीव- धक्क्याने निधन झालं होतं. आठवड्याभरात एकाच कुटुंबात झालेल्या दोन्ही भावांच्या मृत्यूमुळे शेट्ये कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, विलास शेट्ये हे सकाळच्या सुमारास आपल्या बैलाला घेऊन पाणी पिण्यासाठी आणि त्याला आंघोळ घालण्यासाठी नेत होते. यावेळी त्यांचा मुलगा प्रमोद हा सुद्धा त्यांच्यासोबत उपस्थित होता. यावेळी बैलाने अचानक त्यांच्यावर हल्ला चढवला. बैलाने इतक्या जोरात धडक दिली की, विलास शेट्ये हे जमीनीवर जोरात आपटले. बैलाने केलेल्या हल्ल्यात विलास यांच्या छातीला, हाताला आणि चेहर्‍यावर गंभीर जखम झाली होती. या हल्ल्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला.

मिळालेल्या माहितीनुसार, बैलाने हल्ला केल्यावर विलास शेट्ये हे खाली पाण्यात कोसळले आणि त्यांच्या आसपास तब्बल दोन तास हा बैल उभा होता. त्यामुळे दोन तास विलास शेट्ये हे चिखलातच पडून होते.

सिंधुदुर्गातील मालवण विरण बाजार येथे मंगळवारी मध्यरात्री विजय बेलवलकर यांच्या घराच्या अंगणात येऊन बिबट्याने कुत्र्याचा फडशा पाडला आहे. मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास घडलेली ही घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झाली आहे. विरण बाजार परीसरात भरवस्थीत बिबट्याचा वावर वाढल्यामुळे परीसरात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!