परमपुज्य गुरुवर्य कै . नानु भिकाजी वानखेडे यांचा जन्म१५ जुलै १९२१ मध्ये झाला त्यांचे शतक पुर्ती वर्ष दिना निम्मीत सादर नमन..

रावेर शहर प्रतिनिधी – ( ईश्वर महाजन )

सरांचा (गुरुवर्य ) यांचा जन्म हा अत्यंत गरीब वानखेडे (माळी) कुंटुबात झाला वडील भिकाजी शहादु वानखेडे गरीब शेतकरी तर ७ अपत्य त्यात चार मुली तर तीन मुल असा परिवार जेमतेम व हलाखीची गरीबीची परीस्थीती त्यावर मात करीत हे अविश्वनीय असे शिक्षणाच कार्य त्यावेळेस सोप्प नव्हत परिस्थीती ही व परिवारात शिकणाचा वारसा नसताना . केवळ जिद्द प्रवृत्ती डोळ्यासमोर आदर्श असे राजे छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतीबा फुले सावित्रीमाई फुले ., महात्मा गांधी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे आदर्श ठेवत शिक्षण केले सरां मध्ये शिक्षणा सोबत शेती काम करून त्या काळात एम ए बी .टी .पर्यंत शिक्षण पुर्ण करीत कोणी माळी समाजातील मुलगा यांने शिक्षक बनला ते पण रावेर तालुक्यातुन रसलपुर गावातील मुलगा महात्मा जोतीबा फुले व सावित्री फुले यांचे आदर्श घेत शिक्षण क्षेत्रात सेवा करण्याचा एकमेव मानस एम .ए बी टी . केले व या भागात नवीन ओळख निर्माण केली त्यांनी अनेक विद्यार्थी घडविले त्यांच्या परिवारात पत्नी शांताबाई नानु वानखेडे यांनी नेहमी मोलाची साथ दिली आपल्या परिवारात चार मुली व तीन मुले त्यात मोठा मुलगा त्र्यंबक नानु वानखेडे वार्शी येथे मॅनेजर म्हणुन सेवा दिली तर व्दीतीय चिरंजीव हे अमरावती येथे संत गाडगे बाबा कार्यशाळांमध्ये ( विद्यापीठात ) ज्युलॉजी विभाग प्रमुख म्हणुन सेवा (कोड्याची ) मकडी नवीन प्रजाती शोधण्याचे कार्य त्यांनी केले द आज दोघं हयात नाहीत तर तृतीय चिरंजीव रावेर येथील नामवंत शांत ,संयमी व जो देगा उसका भी भला जो नही देगा उसका भी भला नाममात्र फी वर बरेच कार्य करणारे डॉक्टर. श्री रविंद्र नानु वानखेडे हे BAMS करीत गेल्या तीस ते पस्तीस वर्षा पासुन आरोग्य सेवा देत आहेत तर पत्नी सौ. स्वर्गवासी डॉ निलीमा वानखेडे यांनी पण आरोग्य सेवेचा कार्य अमृता पॅथालॉजी व अनिकेत हॉस्पीटल व्दारे कार्य केले परंतु मागील 3 वर्षा आधी किडनी च्या त्रासाने डीसेबर २०१८ मध्ये निधन झाले तर त्याच्या दोघांच्या वारसा चालवत चिरंजीव डॉ अनिकेत रविंद्र वानखेडे MD म्हणुन औरगांबाद येथे सेवा देत आहे सराच्या वारसा उत्तम प्रकारे सुरु आहे सरांनी आपल्या जीवनात अनेक विदयार्थी घडविले त्यात डॉक्टर , इंजिनीअर्स , वकील ‘ प्राध्यापक , कलेक्टर , आमदार ‘ खासदार, कुलगुरु व विदेशात पण आजही अनेक विद्यार्थी आहेत व घडविले सरदार जी. जी . हायस्कुल रावेर मुख्याध्यापक झाल्यानंतर अनेक असे नवीन धोरणात्मक निर्णय घेण्यात महत्वाचा वाटा तर ११ व १२ वर्गाची जुनिअर कॉलेजची परवानगी पण आणण्यात प्रमुख भुमिका ज्युनिअर कॉलेजच्या प्रथम प्राचार्य म्हणुन त्यांनी काम केले त्यांचे हिंदी , इग्लीश व संस्कृत यात विशेष प्राविण्य तर आपल्या जीवनात सामाजिक व शैक्षणिक सदैव सहकार्याची भुमिका तर आपल्या जीवनात महात्मा ज्योतीबा फुले यांना आदर्श म्हणुन कार्य करतांना बस स्टॅड भागात किर्तनकार मुक्कीम बुआ यांच्या जागेत ग्रामीण भागातील मुलां साठी महात्मा ज्योतिबा फुले वसतीगृह यांची सुरवात केली व योग्य प्रकारे नियोजनबद्ध असे सेवा दिली समाजविद्यार्थी घडवणे यालाच महत्त्व देत पैसे नाही आहेत का आपल्या शिक्षणाचा फायदा मुलांना करून दिला तर यामुळे आज उच्च पदवीधर विद्यार्थी त्यांचे नाव आजही त्यांचे नाव विशेष आदराने घेत असतात तर पुढे रावेर भागात स्व . विठ्ठल शेठ नाईक यांना योग्य ती सहकार्य करीत रावेर भागात बारावीच्या पुढील शिक्षण क्षेत्र व्हावे याचे महत्त्व पटवून देत कला वाणिज्य व्ही एस नाईक कॉलेज रावेर यात त्यांचा खारीचा वाटा तर संस्थेचे पहिले सचिव म्हणून कार्य केले तसेच प्राचार्य म्हणून शहाणे सर यांनी काम पाहिले तर सरांनी आपल्या मूळ गावी म्हणजे रसलपुर येते व्ही एस नाईक कॉलेज यांचेही शाखा म्हणजे माध्यमिक हायस्कूल व्हावे व ते करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली हायस्कूलमधील . इ स. १९७९ वर्ष सेवानिवृत्त झाल्यानंतर ही समाजात कार्य करावं व सामाजिक क्षेत्रामध्ये आपलं ज्ञानाचा उपयोग व्हावा यासाठी बरेच असे उपक्रम राबवले .यात प्रमुख म्हणजे माळी समाज अध्यक्ष म्हणून त्यांनी सतत 35 वर्ष समाज अध्यक्ष म्हणुन सेवा केली तसेच समाज शिक्षण तळागाळातील समाजात प्रबोधन करीत समाज ट्रस्ट रजिस्ट्रेशन केले व लग्नासाठी लागणारे उपयुक्त साहित्य भांडे व इतर वस्तू ह्या माळी समाजच्या लोकवर्गणीतून घेण्याचा फार मोलाची भूमिका बजावलीतसेच समाजात हुंडा पद्धत बन्द व्हावी समाज एकीकरण ‘ चुकीच्या अनिष्ट प्रथा यावर समाज जनजागृतीचे काम केलेतर समाजामध्ये सामूहिक विवाह झाला पाहिजे यासाठी बऱ्याच वेळा प्रयत्नही केलेत फलश्रुती म्हणून 23 मे 1991 साली .पहिल्यांदा माळी समाज सामूहिक विवाहरावेर येथे पार पडला परंतु त्यावेळेस ते बघण्यासाठी हयात नव्हते पण त्यांचे स्वप्न पूर्ण झालेतर महात्मा ज्योतिबा फुले यांची27 नोव्हेंबर 1990 यांची शताब्दी पुण्यतिथीसाजरी करीत असताना सर्व समाज बांधव बैठकीतच आपले विचार मांडत असताना गुरवर्य भिकाजी नानू वानखेडे सरांना हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांची प्राणज्योत मावळली महात्मा ज्योतिबा फुले यांचे विचार तळागाळात नेण्याचा त्यांचा प्रयत्न आजही त्यांचे पुत्र डॉ. रविद्र वानखेडे हे आपल्या आरोग्य सेवावृत्ती वेळोवेळी दिसुन येत आहेत तर गेल्या १० वर्षा पासुन रुग्णवाहीका ना .भि. वानखेडे यांच्या नावाने आजही रुग्ण सेवेचे कार्य करीत आहे कारोना काळात रावेर तालुक्यातील अद्‌भुत पुर्व कार्य त्याने व त्यांचे सहकारी वर्ग तसेच अब्युलेन्स चालक वासु वानखेडे ज्याला आरोग्य दुत म्हणुन कार्या मुळेच पंधरा वर्षा पासुन ओळख आहे असे कार्य करणाऱ्या वानखेडे परिवारास तसेच स्वर्गीय .नानु भिकाजी वानखेडे यांना शतत नमन ….. 🙏

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!