अनंत गिते यांच्या ठिणगीनंतर शिवसैनिक अस्वस्थ, रायगडमध्ये गुप्त बैठक

रायगड,

माजी केंद्रीय मंत्री अनंत गीते यांनी राष्ट्रवादी काँग-ेस आणि शरद पावार यांच्या संदर्भात केलेल्या केलेल्या वक्?तव्याचे पडसाद आता रायगडात उमटू लागले आहेत. शिवसैनिकांची मतं जाणून घेण्यासाठी उद्योग मंत्री सुभाष देसाई यांच्या नेतृत्वाखाली जिल्हयातील शिवसेना आमदार, पदाधिकारी आणि प्रमुख कार्यकर्त्यांची गुप्त बैठक आज पार पडली.

या बैठकीला उपस्थित बहुतेक पदाधिकार्‍यांनी राष्ट्रवादी काँग-ेसचे खासदार सुनील तटकरे आणि पालकमंत्री आदिती तटकरे यांच्या विरोधात सूर आळवला. आघाडीतील प्रमुख घटक पक्ष असूनदेखील शिवसेनेला जिल्हयात योग्य सन्मान मिळत नाही. तटकरे हे शिवसेनेचे खच्चीकरण करत आहेत. जिल्हा नियोजन समितीमधील निधी वाटपातही सवतासुभा होत असल्याची तक्रार यावेळी देसाई यांच्याकडे करण्यात आली.

शिवसेनेकडून आघाडी धर्माची अपेक्ष ठेवली जाते. मात्र, राष्ट्रवादीकडून आघाडीचा धर्म पाळला जात नाही. प्रत्येक ठिकाणी सेनेला दडपण्याचा प्रयत्न होत आहे. त्यामुळे आगामी काळात येणार्‍या निवडणूका स्वबळावर लढण्याचा आग-ह या बैठकीत धरण्यात आला. या बैठकीला सुनील तटकरे यांचे बंधू माजी आमदार अनिल तटकरे, यांच्यासह आमदार महेंद्र दळवी, आमदार महेंद्र थोरवे, आमदार भरत गोगावले, जिल्हाप्रमुख अनिल नवगणे, मनोहर भोईर उपस्थित होते. या बैठकीनंतर माध्यमांशी बोलण्यास सुभाष देसाई यांच्यासह पदाधिकार्‍यांनी नकार दिला. ही बैठक आगामी निवडणूकांवर चर्चा करण्यासाठी होती अशी सारवासारव करण्यात आली.

काय बोलले होते अनंत गिते?

शिवसेना आणि काँग-ेस कधीच एक होऊ शकत नाहीत, अर्से सांगत शिवसेनेचे माजी खासदार अनंत गीते यांनी नेतृत्वाला घरचा आहेर दिला होता. राष्ट्रवादीचा जन्म काँग-ेसच्या पाठीत खंजीर खुपसून झाला आहे. शरद पवार आमचे नेते होऊ शकत नाहीत, महाविकास आघाडी ही केवळ तडजोड आहे, असं अनंत गीते म्हणाले होते.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!