शिवसेनेचे अनंत गीते यांचा राष्ट्रवादीवर घणाघात, पवार हे आमचे नेते होऊ शकत नाहीत!

रायगड,

शिवसेना आणि काँग-ेस कधीच एक होऊ शकत नाहीत, असे सांगत शिवसेनेचे माजी खासदार अनंत गीते यांनी नेतृत्वाला घरचा आहेर दिला आहे. राष्ट्रवादीचा जन्म काँग-ेसच्या पाठीत खंजीर खुपसून झाला आहे. शरद पवार आमचे नेते होऊ शकत नाहीत, असा घणाघात केला आहे. महाविकास आघाडी ही केवळ तडजोड आहे, असे अनंत गीते म्हणाले.

राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असताना माजी केंद्रीय मंत्री शिवसेनेचे अनंत गीते यांनी सेना नेतृत्वाला घरचा आहेर दिला आहे. दोन्ही काँग-ेस जर एक होऊ शकत नाहीत तर शिवसेना आणि काँग-ेस कदापि एक होऊ शकत नाहीत, असं अनंत गीते म्हणाले. राष्ट्रवादी काँग-ेसचा जन्मच मुळात काँग-ेसच्या पाठीत खंजीर खुपसून झालाय, असा घणाघात गीते यांनी यावेळी केला.

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे आमचे नेते होऊ शकत नाहीत, महाविकास आघाडी सरकार ही केवळ सत्तेसाठीची तडजोड असल्याची आठवण त्यांनी करून दिली. लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर अज्ञात वासात गेलेले अनंत गीते पुन्हा रायगडच्या राजकारणात सक्रिय झाले आहेत. श्रीवर्धन इथं त्यांच्या उपस्थितीत झालेल्या मेळाव्यात माजी जिल्हा परिषद सदस्य अविनाश कोळंबकर यांच्यासह अनेकांनी शिवसेनेत प्रवेश केला.शिवसेनेचे आमदार महेंद्र दळवी, महेंद्र थोरवे यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!