तुळापुरमध्ये शंभूशौर्य दीपोत्सव सोहळा पार, शेकडो दिव्यांनी बलिदान परिसर उजळला

तुळजापूर प्रतिनिधी

दिवाळीचा पहिला दिवा माझ्या राजाला, स्वराज्याला

दिवाळीच्या पार्श्वभूमीवर सालाबाद प्रमाणे यावर्षी पुणे जिल्ह्यातील हवेली तालुक्यातील तुळापूर या ठिकाणी असलेल्या धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदान स्थळाची दिवाळीच्या पार्श्वभूमीवर दिवाळीचा पहिला दिवा माझ्या राजाला, स्वराज्याला या संकल्पनेतून छत्रपती संभाजी महाराज सेवा समिती, तुळापूर यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित करण्यात आलेला दिपोत्सव सोहळा ०१-११-२०२१ सोमवार रोजी सायंकाळी समाधी स्थळी मोठ्या उत्साहाने पार पडला.

स्वराज्य साठी ज्यांनी बलिदान केलेले आहे.अशा महात्म्यांच्या स्मरणाने दिवाळी सणाची सुरुवात करण्याचा संकल्प कौतुकास्पद आहे.छत्रपती संभाजी राजांनी आपलं स्वराज अभेद्य ठेवलं.आज त्याच्या मुळें सुखाने जगतो त्यांच्या पवित्र अशा त्रिवेणी संगमावरील समाधी स्थळी आपल्या दिवाळी सणाचा पहिला दिवा धर्मवीर छ. शंभुराजेंच्या चरणी लागावा म्हणून भक्तिभावनेने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

महाराष्ट्रातल्या विविध जिल्ह्यातून आलेल्या शंभूराजेच्या भक्तांनी तुळापूर ग्रामपंचायत सदस्य, छत्रपती संभाजी महाराज समिती कडून स्वच्छते बरोबरच संध्याकाळी समाधी स्थळाची दिवाळीच्या दिव्यांनी तसेच बलिदान भूमी परिसरात आकर्षक विद्युत रोषणाई विविध रंगांच्या फुलांनी सजवण्यात आले. शेकडो दिव्यांनी बलिदान भूमी परिसर उजळला संभाजी ‘महाराज की जय’ अशा जयघोषाने परिसर दुमदुमला.

या भव्य दिव्य सोहळ्यात मर्दानी खेळ, शाहिरी पोवाडे, अग्नी खेळ, काव्यसंमेलन व व्याख्यान अश्या भरपूर कार्यक्रमांचे आयोजन या निमित्ताने करण्यात आले होते.

याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून रोहित आर आर पाटील, आमदार हर्षवर्धन जाधव, संताजी जाधव यांचे तेरावे वंशज अमरसिंहराजे जाधवराव, डॉ.सुवर्णाताई निंबाळकर, आदेश नागवडे, रामकृष्ण सातव, सचिन जाधव, दीपक गावडे, आप्पासाहेब हरगुडे,हिरामण हरगुडे, नटराज सातव, संतोष शिवले, रुपेश शिवले, आमदार ,सरपंच उपसरपंच, राजकीय पुढारी समाजसेवक, उद्योजक ,तुळापूर ग्रामपंचायत सदस्य, छत्रपती संभाजी महाराज सेवा समिती सदस्य, गावकरी मंडळी,महिला वर्ग युवा पदाधिकारी, युवा कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

दिवाळीच्या पार्श्वभूमीवर सालाबाद प्रमाणे यावर्षी पुणे जिल्ह्यातील हवेली तालुक्यातील तुळापूर या ठिकाणी असलेल्या धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदान स्थळाची दिवाळीच्या पार्श्वभूमीवर दिवाळीचा पहिला दिवा माझ्या राजाला, स्वराज्याला या संकल्पनेतून छत्रपती संभाजी महाराज सेवा समिती, तुळापूर यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित करण्यात आलेला दिपोत्सव सोहळा ०१-११-२०२१ सोमवार रोजी सायंकाळी समाधी स्थळी मोठ्या उत्साहाने पार पडला.स्वराज्य साठी ज्यांनी बलिदान केलेले आहे.अशा महात्म्यांच्या स्मरणाने दिवाळी सणाची सुरुवात करण्याचा संकल्प कौतुकास्पद आहे.छत्रपती संभाजी राजांनी आपलं स्वराज अभेद्य ठेवलं.आज त्याच्या मुळें सुखाने जगतो त्यांच्या पवित्र अशा त्रिवेणी संगमावरील समाधी स्थळी आपल्या दिवाळी सणाचा पहिला दिवा धर्मवीर छ. शंभुराजेंच्या चरणी लागावा म्हणून भक्तिभावनेने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.महाराष्ट्रातल्या विविध जिल्ह्यातून आलेल्या शंभूराजेच्या भक्तांनी तुळापूर ग्रामपंचायत सदस्य, छत्रपती संभाजी महाराज समिती कडून स्वच्छते बरोबरच संध्याकाळी समाधी स्थळाची दिवाळीच्या दिव्यांनी तसेच बलिदान भूमी परिसरात आकर्षक विद्युत रोषणाई विविध रंगांच्या फुलांनी सजवण्यात आले. शेकडो दिव्यांनी बलिदान भूमी परिसर उजळला संभाजी ‘महाराज की जय’ अशा जयघोषाने परिसर दुमदुमला.या भव्य दिव्य सोहळ्यात मर्दानी खेळ, शाहिरी पोवाडे, अग्नी खेळ, काव्यसंमेलन व व्याख्यान अश्या भरपूर कार्यक्रमांचे आयोजन या निमित्ताने करण्यात आले होते.याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून रोहित आर आर पाटील, आमदार हर्षवर्धन जाधव, संताजी जाधव यांचे तेरावे वंशज अमरसिंहराजे जाधवराव, डॉ.सुवर्णाताई निंबाळकर, आदेश नागवडे, रामकृष्ण सातव, सचिन जाधव, दीपक गावडे, आप्पासाहेब हरगुडे,हिरामण हरगुडे, नटराज सातव, संतोष शिवले, रुपेश शिवले, आमदार ,सरपंच उपसरपंच, राजकीय पुढारी समाजसेवक, उद्योजक ,तुळापूर ग्रामपंचायत सदस्य, छत्रपती संभाजी महाराज सेवा समिती सदस्य, गावकरी मंडळी,महिला वर्ग युवा पदाधिकारी, युवा कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!