देशातील नामांकित आय.आय.बी. शिक्षण संस्थेच्या वतीने तुळजापूर येथील दहावीच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन कार्यक्रम संपन्न….

तुळजापूर प्रतिनिधी – ( अजित चव्हाण )

तुळजापूर येथील आदित्य कोचिंग क्लासेसच्या वतीने ‘ दहावीनंतर पुढे काय ? ‘ या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी लातूर येथील सुप्रसिद्ध IIB चे प्रा.आशिष बिडवे सर, प्रा. सुशील ईनचुरे सर, प्रा. मुझ्झामिल शेख सर व प्रा. बुरांडे सर यांचे विद्यार्थ्यांना अनमोल मार्गदर्शन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तुळजापूर नगरीचे नगराध्यक्ष मा. सचिन भैय्या रोचकरी व तुळजापूर पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक मा. कांबळे साहेब होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आदित्य कोचिंग क्लासेसचे संचालक मा. ए.जी. सुरवसे सर यांनी मांडले.
तुळजापूर तालुक्यातील पालक वर्ग व विद्यार्थ्यी खुप मोठ्या प्रमाणात उपस्थित होते, या प्रसंगी आवर्जून उपस्थित असलेले तुळजाभवानी अध्यापक विद्यालयाचे प्राचार्य मा.दौंड सर, तुळजाभवानी माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक मा. जोगदंड सर, जवाहर नवोदय विद्यालयाचे प्रा. मा. गायकवाड सर, महाराष्ट्र विद्यालयाचे शिक्षक मा. आर बी. मोरे सर व आदित्य कोचिंग क्लासेसचे शिक्षक वृंद उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी उत्कृष्ट असे सूत्र संचालन प्रा.मा. विवेकजी कोरे सर यांनी केले.कार्यक्रमाच्या शेवटी आभार प्रदर्शन मा. वैजनाथ मिटकरी सर यांनी मांडले.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!