भारतीय स्टेट बँकेच्या माध्यमातून केंद्र सरकारच्या विविध योजनांचा लाभ घ्या- शाखा प्रबंधक आशुतोष वर्मा

निफाड प्रतिनिधी-(रामभाऊ आवारे)

कोरोना काळात निर्माण झालेल्या आर्थिक संकटाच्या काळात भारतीय स्टेट बँकेच्या सर्वसाधारण खातेधारक,शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी बँकेच्या अनेक योजना चालवल्या जात आहेत.यामध्ये पेन्शन लोन पीक व मुदत कर्ज वैयक्तिक कर्ज होम लोन या विविध कर्ज योजनांचाही समावेश आहे.प्रधानमंत्री जीवनज्योति अपघात विमा योजना,सुरक्षा विमा योजना,अटल पेन्शन योजना,आरोग्य प्लस पॉलिसी,जेष्ठ नागरिकांसाठी मुदत ठेव योजना असलेल्या केंद्र सरकारच्या विविध योजनांचा लाभ बँक ग्राहकांना घेण्याचे आवाहन शाखा प्रबंधक आशुतोष वर्मा यांनी केले.
ते भारतीय स्टेट बँकेच्या ‘ग्राहक हितगुज’मेळाव्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी उपशाखा अधिकारी गिरीश तळले,कृषी सहाय्यक अक्षय हांडे आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी उपशाखा अधिकारी गिरीश तळले यांनी सांगितले की,सद्यःस्थितीत कोरोंनाची लाट काहीशी ओसरताना दिसत आहे.परंतु सरकार आणि तज्ज्ञांनी आता कोरोनाची तिसरी लाट येण्याचा अंदाज वर्तवला आहे.रोजगार, नोकऱ्या गमवाव्या लागल्यानं सध्या अनेक जण आर्थिक अडचणींचा सामना करीत आहेत.अशातच कुटुंबातील कोणाला कोरोनाचा संसर्ग होऊन आपत्कालीन आरोग्य स्थिती निर्माण झाली तर वैद्यकिय खर्च कसा करायचा असा प्रश्न भेडसवात आहे यासाठी ‘कवच वैयक्तिक कर्ज योजनेचा’लाभ घेण्याचे त्यांनी सांगितले.याप्रसंगी शुभम निकम,शुभम बोकडे, राजेंद्र मेमाणे,मनोहर बोचरे,संतोष साबळे,प्रशांत बंधान,धनंजय घोलप आदीसह बँक खातेधारक उपस्थित होते.कार्यक्रम यशस्वीतेसाठी सचिन नागरे,दत्तू माळी यांनी परिश्रम घेतले.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!