मागील वर्षी झालेल्या चक्रीवादळामुळे पिकांच्या नुकसान भरपाईची रक्कम त्वरित शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात यावी, अन्यथा आंदोलन करण्यात येईल.

जिल्हा कृषी अधिकारी यांना देण्यात आले निवेदन.

निंभोरा(प्रमोद कोंडे.):-दि.४

रावेर तालुक्यात मागील वर्षी झालेल्या चक्रीवादळाने खानापूर सर्कल मधील शेतकऱ्यांच्या शेतातील पिकांचे मोठया प्रमाणात नुकसान झाले होते, या नुकसानाची भरपाईची रक्कम आतापर्यंत अहिरवाडी गावातील शेतकऱ्यांना मिळाली नाही. तरी लवकर निर्णय घेऊन ती रक्कम येत्या आठ ते दहा दिवसांमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात यावी, ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा न झाल्यास रस्ता रोको आंदोलन करण्यात येईल असे निवेदन जळगाव जिल्हा कृषीअधिकारी दिपक ठाकूर यांना देण्यात आले. निवेदन देतांना भाजपाचे संदीप सावळे व भाजपा युवा मोर्चाचे पराग चौधरी, आकाश महाजन, नितीन महाजन, संजय दळवी, दिनेश महाजन, महेंद्र महाजन, गुल्लू महाजन, विश्वा मराठे दिगंबर राजपूत, गोकुळ चौधरी, हे सर्व शेतकरी बांधव उपस्थित होते. अहिरवाडी, कर्जोद , केऱ्हाळा, खानापूर, अटवाडा, असे खानापूर सर्कल पूर्ण भागातील शेतकऱ्यांची शेतातील झालेल्या नुकसानाची रक्कम त्वरित जमा करा अन्यथा मोठ्या प्रमाणात आंदोलन करण्यात येईल असा इशारा शेतकरी बांधवातर्फे जिल्हा कृषी अधिकाऱ्यांना निवेदन देऊन करण्यात आला.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!