कॉमेडी-किंग राजू श्रीवास्तव यांचे निधन….

नवी दिल्ली – 21 सप्टेंबर –

भारतीय रसिकांचे गेल्या 30 वर्षांपासून निखळ विनोदांच्या माध्यमातून मनोरंजन करणारे कॉमेडी-किंग राजू श्रीवास्तव यांनी बुधवारी निधन झाले. काही दिवसांपूर्वी जीममध्ये ट्रेड मिलवर धावत असताना त्यांना अचानक हदयविकाराचा झटका आला. त्यानंतर त्यांनी उपचारासाठी एम्सममध्ये दाखल करण्यात आले होते.

राजू यांनी टीव्ही मनोरंजन विश्वात वेगळे स्थान निर्माण केले होते. 1990 च्या दशकांतील टीव्ही मालिकांमध्ये छोट्या भूमिका करुन राजु श्रीवास्तवची मोठी झलक इंडियन लाफ्टर चँलेजमध्ये दिसली होती. या मालिकेला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसादही मिळाला होता. पहिल्या लाफ्टर चँलेजचे विजेतेपद हे सुनील पालने मिळवले होते. मात्र राजू श्रीवास्तव सगळ्यात लक्षवेधी ठरले होते. राजुने त्या मालिकेतून अमाप लोकप्रियता मिळवली. घराघरात त्यांचे नाव झाले. ते प्रेक्षकांच्या आवडीचा सेलिब्रेटी झाले होते. राजुने वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर काम केले. त्यानी मालिका. चित्रपट, जाहिराती यामध्ये काम केले. याशिवाय काही हिंदी विनोदी नाटकांमध्ये देखील त्यानं केलेल्या भूमिकांना प्रेक्षकांनी पसंत केले होते.

राजू सुमारे 40 दिवसांपासून दिल्लीतल्या एम्स रुग्णालयात उपचार घेत होते. ट्रेडमिलवर धावता धावता राजू खाली कोसळले. त्याला हदयविकाराचा झटका आल्याचे सुत्रांनी सांगितले होते. डॉक्टरांच्या पथकाने त्यांचा वैद्यकीय इतिहास तपासल्यानंतर अँजिओग्राफी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर तो क्लिनिकल उपचारांना प्रतिसाद देत असल्याचेही सांगण्यात आले होते. राजुच्या जाण्याने त्याच्या चाहत्यांना मोठा हादरा बसला आहे. सोशल मीडियावरुन त्यांच्या लाखो चाहत्यांनी आदरांजली वाहिली आहे. त्यामध्ये त्यांनी त्याच्याविषयीच्या आठवणींना उजाळा दिला आहे. राजु केवळ कलाकार म्हणून नव्हे तर एक माणूस म्हणूनही तो प्रेरणादायी होता. अशा प्रकारच्या प्रतिक्रिया व्हायरल झाल्या आहे. राजुला बॉलीवूडमधील अनेक सेलिब्रेटींनी आदरांजली वाहिली आहे.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!