भारतातील घाऊक किमतीवर आधारित निर्देशांकाची ऑॅगस्ट, 2021 महिन्यासाठीची आकडेवारी (आधार वर्ष: 2011-12)

नवी दिल्ली,

वाणिज्य सल्लागार, उद्योग व अंतर्गत व्यापार प्रोत्साहन विभाग, यांचे कार्यालय भारतात घाऊक किमतीवर आधारित निर्देशांकाची ऑॅगस्ट, 2021 महिन्यासाठीची आकडेवारी (आधार वर्ष: 2011-12), जाहीर करत आहे. या प्रसिद्धी पत्रकात ऑॅगस्ट, 2021ची प्राथमिक आकडेवारी असून जून, 2021 ची आकडेवारी अंतिम आहे. घाऊक किंमत निर्देशांक, (संदर्भ) महिन्यातील दोन आठवड्याच्या अंतराने तसेच संस्थात्मक स्रोतांकडून व देशभरातील निवडक उत्पादक कंपन्यांकडून प्राप्त झालेल्या माहितीच्या आधारावर प्रत्येक महिन्याच्या 14 तारखेला (अथवा पुढच्या कामकाजाच्या दिवशी) जाहीर केला जातो. दहा आठवड्यानंतर अंतिम निर्देशांक जाहीर केला जातो आणि त्या नंतर तो गोठवला जातो.

ऑॅगस्ट 2021 या महिन्यासाठी प्राथमिक वार्षिक महागाई दर 11.3म असून, ऑॅगस्ट 2020च्या तुलनेत 0.41म आहे. गेल्या वर्षी याच महिन्यातील दराच्या तुलनेत, खाद्येतर वस्तू, खनिज तेल, कच्चे तेल आणि नैसर्गिक गॅस, मुलभूत धातू, खाद्य पदार्थ, वस्त्रे, रसायने आणि रासायनिक उत्पादने या सारख्या उत्पादनांच्या किमितीत वाढ झाल्याने, ऑॅगस्ट 2021मध्ये महागाईचा उच्च दर नोंदवला गेला.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!