अडीच वर्षीय चिमुरडयाचे अपहरण करून हत्या

अलिबाग

रायगडच्या माणगाव तालुक्यातील बोर्ले गावात रुद्र यादव या अडीच वर्षीय चिमुरडयाचे अपहरण करून हत्या करण्यात आली आहे. मृत मुलाची नातेवाईक असलेल्या मुलीशी आरोपी संतोष यादव याचे प्रेमसंबंध होते. तिने लग्न मोडल्याचा संतोष याला संशय होता. याच रागातून संतोष याने रुद्र याला फिरायचा जाण्याचा बहाणा करुन पळवून नेले. त्यानंतर गळा आवळून हत्या केली. तो एवढ्यावरच तांबला नाही. आपल्या पहिल्या प्रेयसीचा खून करण्यासाठी तो सिल्वासा इथे निघाला. दरम्यान, पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले.

बोर्ले गावात एका चिमुरडयाचे अपहरण करून हत्या करण्यात आल्याने संताप व्यक्त होत आहे. प्रेमपक्ररणातून ही हत्या करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. या प्रकरणी माणगाव पोलीसांनी त्याच गावातील संतोष यादव याला गुजरातमधील वापी इथून अटक केली आहे. मृत मुलाची नातेवाईक असलेल्या मुलीशी संतोषचे प्रेमसंबंध होते. त्याला तिच्याशी लग्न करायचे होते परंतु नंतर या मुलीने त्याच्याशी असलेले संबंध तोडून टाकले. रूद्रच्या कुटुंबियांनी सांगितल्यावरूनच तिने हे संबंध तोडून टाकले व लग्न मोडले असा संतोषला संशय होता.

त्यानंतर संतोषने रुद्रला फिरायला घेऊन जातो सांगून पळवून नेले आणि रोहा तालुक्?यातील चणेरा भागात गळा आवळून त्याची हत्या केली. त्यानंतर आपल्या जुन्या प्रेयसीचा खून करण्यासाठी तो सिल्वासा इथे निघाला असता वापी इथे पोलिसांनी त्याच्या मुसक्?या आवळल्या. पोलिसांच्या सतर्कतेमुळे पूर्व प्रेयसीचा खून करण्याचा त्याचा इरादा बारगळला. याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या खुनी संतोषला न्यायालयाने त्याला 3 नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!