वाकला – चांदेश्वर जलप्रकल्प विशेषबाब म्हणुन पुर्ण करावे – खासदार इम्तियाज जलील गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळातंर्गत जलविकासाचा खासदार इम्तियाज जलील यांनी घेतला सविस्तर आढावा

औरंगाबाद

वैजापुर तालुक्यातील वाकला – चांदेश्वर जलप्रकल्प अत्यंत महत्वपुर्ण असुन प्रकल्प पुर्ण झाल्यास दुष्काळातही परिसरातील सर्व गावांचा पिण्याचा पाण्याचा प्रश्न मिटणार असल्याने खासदार इम्तियाज जलील यांनी मुंबई येथे जलसंपदा मंत्री जयंतराव पाटील यांच्यासोबत बैठक घेतल्यानंतर आज गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळ कार्यालयात वाकला – चांदेश्वर प्रकल्प व औरंगाबाद जिल्ह्यातील सर्व सिंचन प्रकल्पासंबंधी संबंधित सर्व विभागाच्या अधिकार्‍यांची आढावा बैठक घेतली.

वाकला – चांदेश्वर साठवण तलाव हा प्रकल्प औरंगाबाद व नाशिक जिल्ह्याच्या सिमेवर असलेल्या वैजापूर तालुक्यातील वाकला गावाजवळ तापी खोर्‍यातील हत्तीघोडा नाल्यावर आहे. सदरील प्रकल्प वेळेत पुर्ण होणे अत्यंत गरजेचे असल्याने गोदवरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाकडे मागील 3 वर्षापासुन खासदार इम्तियाज जलील सतत पाठपुरावा करत आहे. मध्यंतरी काळात हा प्रकल्प 600 हेक्टर्स पेक्षा कमी सिंचन क्षमतेचा असल्यामुळे जलसंपदा विभागाकडून जलसंधारण विभागाकडे हस्तांतरीत करण्यात आल्याने कामास अधिक विलंब झाला. खासदार इम्तियाज जलील यांनी सदरील प्रकल्प विशेष बाब म्हणून जलसंपदा विभागाकडे परत हस्तांतरण करण्याचे सुचना दिल्या.

तापी पाटबंधारे विकास महामंडळ जळगाव यांनी मन्याड प्रकल्पाच्या जलनियोजनात पाण्याची तुट येणार असल्याने वाकला – चांदेश्वर प्रकल्पास पाणी उपलब्धता प्रमाणपत्र देण्यास नकार दिल्यामुळे आजतागायत प्रकल्प पुर्ण झाला नसल्याने खासदार इम्तियाज जलील यांनी दुष्काळ परिस्थितीत पिण्याच्या पाण्यासाठी पंचक्रोशीत गावातील ग्रामस्थांची होणारी भटभटकंती पाहता विशेष बाब म्हणुन पाणी उपलब्धता प्रमाणपत्रास पुन्हा नव्याने प्रस्ताव पाठविण्याचे सुचना केल्या. तापी पाटबंधारे विकास महामंडळ जळगाव यांच्याशी समन्वय साधुन विशेष बाब म्हणुन मान्यता घेण्यात येणार असल्याची माहिती खासदार इम्तियाज जलील यांनी दिली आहे.

सदरील बैठकीमध्ये जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंता विजय घोगरे, गोदावरील मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाचे अधिक्षक अभियंता मनोज अवलगांवकर व पाटबंधारे मंडळाचे अधिक्षक अभियंता पाटोळे यांनी खासदार इम्तियाज जलील यांना औरंगाबाद जिल्ह्यातील सर्व सिंचन प्रकल्पाची सविस्तर माहिती दिली. 

खासदार इम्तियाज जलील यांनी औरंगाबाद जिल्ह्यातील ब-म्हगव्हाण उपसा सिंचन योजना पैठण मधील भाग – 2 व गंगापूर मधील भाग 3 प्रकल्प तसेच शिवना टाकळी व वाकोद या बांधकामाधीन मध्यम प्रकल्पांची सद्य:स्थितीवर सविस्तर चर्चा करुन प्रगतीपथावरील कामे गुणवत्तापुर्ण करण्याचे निर्देश संबंधित अधिकार्‍यांना दिले. औरंगाबाद जिल्ह्यातील 10 मध्यम प्रकल्प, 63 लघु प्रकल्प, 4 बंधारे, 2 अनिकट व खाम बंधारा अशा एकूण 80 सिंचन प्रकल्पांच्या पाणी साठवण क्षमता व पाणी पातळी अहवालाची माहिती घेवुन खासदार इम्तियाज जलील यांनी सदरील सर्व प्रकल्पांची पुर्ण संचय पातळी, लघुत्तम जल पातळी, पुर्ण जल क्षमता, उपयुक्त साठा, अनुपयुक्त साठा, एकूण लाभक्षेत्र लावडी लायक क्षेत्र, सिंचित क्षेत्र  निर्मित सिंचन क्षमता विषयी चर्चा करुन परिसरातील गावातील ग्रामस्थांना पाण्यासंबंधी कोणत्याही प्रकारची अडचण होणार याची दक्षता घेवुन वेळेवर सुविधा देण्याचे सुचना केल्या.

बैठकीमध्ये खासदार इम्तियाज जलील यांनी जायकवाडी धरणातील संकल्पीत पाणीसाठा, गाळ काढणे, पिण्याचे पाण्याचे व उद्योगधंदे करिता पाण्याचे आरक्षण विषयी चर्चा केली. जायकवाडी धरण सलग तीन वर्षापासुन पुर्ण भरत असतांना सुध्दा शहरात पाणीपुरवठा करणारी यंत्रणा तांत्रिकदृष्ट्या फार जुनी झाल्याने व समांतर जलवाहिनी घोटाळ्यात अडकली महानगरपालिकाने वेळेवर नियोजनबध्द उपाययोजना केली नसल्यामुळे नागरीकांना वेळेवर मुबलक पाणी पुरवठा होत नसल्याची खंत खासदार इम्तियाज जलील यांनी व्यक्त केली. शहराला 4 टिएमसी पाणी पुरवठ्याची गरज असतांना सद्यस्थिती फक्त 1.5 टिएमसी पाणी उपलब्ध होत आहे त्यामुळे नागरीकांना पाण्याची भटकंती करावी लागत आहे, शहरात सध्या नविन 1680 कोटी रुपयाची जलवाहिनी योजनाचे काम प्रगतीपथावर असुन काम पुर्ण झाल्यावर मुबलक पाणी मिळणार असल्याची माहिती खासदार इम्तियाज जलील यांनी दिली.

सदरील बैठकीमध्ये जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंता विजय घोगरे, गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाचे अधीक्षक अभियंता मनोज अवलगांवकर, कडा विभागाचे अधीक्षक अभियंता अभिजित म्हेत्रे, पाटबंधारे मंडळाचे अधीक्षक अभियंता पाटोळे, कार्यकारी अभियंता अनिल निंभोरे, लघु प्रकल्प विभागाचे कार्यकारी अभियंता गोडसे, जायकवाडी पाटबंधारे विभाग पैठणचे कार्यकारी अभियंता प्रशांत जाधव, सहाय्यक मुख्य अभियंता शिंदे, उपअधिक्षक अभियंता तानवडे, सहाय्यक मुख्य अभियंता शबाना रझवी, वैजापूर तालुक्याचे कार्यकारी अभियंता राकेश गुजरे यांच्यासह इतर संबंधित प्रकल्पाचे अधिकार्‍यांची उपस्थितीत होती.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!