विश्व हिंदू परिषद -बजरंग दल ग्राम समिती बैठक संपन्न..]

नंदुरबार प्रतिनिधी,

नंदुरबार जिल्ह्यातील विश्व हिंदू परिषद – बजरंग दल लक्कड कोट येथे ग्राम समिती बैठक दिनांक 27 ऑगस्ट रोजी संपन्न झाली.
बैठकीचे सुरुवातीला भारत माता, देव मोगरा माता, यांचे प्रतिमा पूजन करण्यात आले.
बैठकीला विश्व हिंदू परिषद बजरंग दल जिल्हा मंत्री विजय राव सोनवणे. विश्व हिंदू परिषद जिल्हा मोठा मंदिर प्रमुख महेश जी टोपले. विश्व हिंदू परिषद एकल विद्यालय अंचल प्रमुख गुलाब पावरा. हे मंचावर उपस्थित होते.
बैठकीला त्रिवार ओंकार राम नाम जप परिचय प्रास्ताविक विश्व हिंदू परिषद संचार प्रमुख दीलवर पावरा यांनी केले
प्रथम सत्रा मध्ये विश्व हिंदू परिषद जिल्हा मोठा मंदिर प्रमुख महेश टोपले यांनी सांगितले की प्रत्येक प्रखंडामध्ये ग्राम समिती, गावाचा विकास, लसीकरण ,ग्राम स्वच्छता, आरोग्य स्वच्छता, साप्ताहिक भजन, हनुमान आरती, झालीच पाहिजे.
दुसऱ्या सत्रामध्ये विश्व हिंदू परिषदेचे जिल्हा मंत्री विजयराव सोनवणे यांनी मार्गदर्शन मध्ये सांगितले की आगामी कार्यक्रम वर्धापन दिन प्रत्येक ग्राम समिती गावावर व त्याच्या शेजारील दोन गावांना कार्यक्रम व्हावेत कार्यक्रमाची रूपरेषा समजून सांगितली 2 नोव्हेंबर रोजी रक्तदान शिबिर घेण्यात यावे, कोरोना ची तिसरी लाट संदर्भात सर्वांनी दक्षता घ्यावी त्याचे उपाय व लसीकरण याबद्दल गावागावात जनजागृती करावी, व प्रत्येकाचे लसीकरण झालेच पाहिजे, प्रत्येक नागरिकांनी लसीकरण करून घ्यावे त्यासाठी आपण जनजागृती करावी असं ते म्हणाले.
विश्व हिंदू परिषद आंचल प्रमुख गुलाब पावरा यांनी समारोप केला दुर्गा वाहिनी प्रखंड प्रमुख मनिषा ताई मोरे ,तोरणा वळवी, रायसिंग पाडवी ,सुरेश पाडवी , उपस्थित होते जामसिंग पावरा यांनी पसायदान व जय घोष करून बैठक संपन्न झाली.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!