नांदेडच्या रंगभूमीचे पुनरागमन

नांदेड,

गेली दोन वर्षापासून बंद असलेली रंगभूमी आता बहरू लागली आहे. महाराष्ट्र शासनाने 22 ऑक्टंबर पासून चित्रपट गृह, नाट्यगृह विविध अटी नुसार सुरू करण्यास परवानगी दिली आहे. त्यामुळे रंगभूमीवर पुन्हा एकदा नवीन उर्जेसहित रंगकर्मी तयारीला लागले आहे. यातच नांदेड शहरातील नाट्य शाळा म्हणून ओळखल्या जाणार्‍या सिने स्टार अ‍ॅक्टिंग अकॅडमीच्या विद्यार्थ्यांचे क्लास रूम प्रोडक्शन चे सादरीकरण झाले यात अक्षय राठोड दिग्दर्शित ”शाळा” आणि श्याम डुकरे दिग्दर्शित आई कुठे काय करते? या विनोदी नाटकांचे सादरीकरण झाले. कार्यक्रमाचे उद्धाटन स्वा.रा. ती. म. विद्यापीठ नाट्य शास्त्र विभाग प्रमुख प्रा. डॉ. पी. विठ्ठल, सिने स्टार अ‍ॅक्टिंग अकॅडमी चे संचालक दिनेश कवडे आणि प्रा. केलास पोपुलवाड यांच्या हास्ते दीप प्रज्वलन करून झाले. या प्रसंगी विद्यार्थ्यांना अभिनय, नाट्य, चित्रपट क्षेत्रात पाठवल्या बद्दल सर्व पालकांचे दिनेश कवडे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आले. सादर झालेल्या नाटकात छाया सरोदे, संदेश राऊत, दीक्षा कुरुडे, बालकलावंत काव्या जाधव, आक्षध चंद्रवंशी, तेजस्विनी रापते, तनिष्का घोडके, अथर्व देसाई यांनी भूमिका साकारल्या. नाटकातील लेखन,दिग्दर्शन, अभिनय, रंगभूषा असे सर्वच बाजू विद्यार्थ्यांनी सांभाळल्या. कार्यक्रम यशस्वीतेसाठी गौतम गायकवाड, पूजा जोशी यांनी काम पाहिले.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!