सामना गमावून कोहलीनं कशी जिंकली पाक फॉनची मनं ?

मुंबई,

आयसीसी टी-20 वर्ल्डकप स्पर्धेत रविवारी खेळल्या गेलेल्या सामन्यात टीम इंडियाला पाकिस्तानकडून 10 विकेटसने पराभव पत्करावा लागला. या पराभवानंतरही टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीने असं काही केलंय की, त्याचं सर्वत्र कौतुक होताना दिसंतय. पराभवानंतरही विराट कोहलीने पाकिस्तानी संघाचा फलंदाज मोहम्मद रिझवानला मिठी मारली. विराट कोहलीचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

पराभवानंतर कोहलीलाही दोन्ही पाकिस्तानी क्रिकेटपटूंनीही हसून मिठी मारली. या दरम्यान दोघांच्या चेहर्‍यावर खूप हास्य होते. पाकिस्तानच्या दोन्ही फलंदाजांनी पहिल्या विकेटसाठी 107 चेंडूत 152 धावांची शतकी आणि विक्रमी भागीदारी केली. टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारताविरुद्ध पाकिस्तानची ही सर्वात मोठी भागीदारी आहे.

पाकिस्तानने सामना जिंकताच मोहम्मद रिझवान मैदानात धावताना दिसला. यादरम्यान मोहम्मद रिझवानचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये भारतीय कर्णधार विराट कोहली त्याला मिठी मारताना दिसतो. हा भारतीय तसचं पाकिस्तानी चाहत्यांनाही खूप आवडला आहे. टीम इंडियाला पराभूत केल्यानंतर कर्णधार विराट कोहलीची मिठी मारण्याची शैली चाहत्यांना खूप भावली.

अपयशाचं मोठं कारण

भारतीय कर्णधार विराट कोहली म्हणाला की, पाकिस्तानी गोलंदाज शाहीन आफ्रिदीने चांगली गोलंदाजी केली आणि शाहीनच्या सुरुवातीच्या विकेटसमुळे भारताचे फलंदाज दडपणाखाली होते. शाहीनच्या सुरुवातीच्या षटकांच्या त्या स्पेलमुळे, भारतीय संघाने 20-25 धावा कमी केल्या, जे नंतरच्या पराभवाचे प्रमुख कारण बनले.

विराटच्या म्हणण्यानुसार, जेव्हा पाकिस्तान दुसर्‍या डावात खेळत होता, तेव्हा 10 षटकांनंतर दव येत होते, त्यानंतर चेंडू बॅटवर चांगला येत होता आणि गोलंदाजांना पकड घेणे कठीण होते. त्यामुळे संथ चेंडू टाकण्याचे शस्त्रही खराब झाले, त्यामुळे भारताला हा लाजिरवाणा पराभव झाला.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!