साहित्य अकादमी आणि गुजराती भवननिर्मिती हे माझ्या यशस्वी जीवनाचे महत्वपूर्ण

मुंबई,

महाराष्ट्रात गुजराती साहित्य अकादमी आणि मुंबईत गुजराती भवनची निर्मिती करणे हे दोन माझ्या यशस्वी जीवनाचे महत्वपूर्ण टप्पे आहेत, अशा शब्दांत ब्रुहन्मुंबई गुजराती समाज, महाराष्ट्र गुजराती समाज महामंडळाचे अध्यक्ष डॉ. हेमराज शाह यांनी कृतज्ञता व्यक्त केली. हेमराज शाह यांना कँनडा येथील ब-ॉम्प्टोन इंटरनँशनल युनिव्हर्सिटी तर्फे मध्य प्रदेशातील इंदूर येथील ’मेरियेट’ या पंचतारांकित हॉटेलमध्ये डॉ. राजीब पाल यांच्या हस्ते एका शानदार समारंभात मानवता आणि सामाजिक कार्याबद्दल ’डॉक्टरेट’ पदवी प्रदान करण्यात आली. त्याचप्रमाणे हेमराज शाह यांच्या गुजराती समाज अध्यक्षपदाला पंचवीस वर्षे पूर्ण झाली. या त्यांच्या रौप्यमहोत्सवी कारकीर्दिबद्दल त्यांचा अंधेरी मुंबई येथील आलीशान गुजराती समाज भवनात शानदार  ’अभिनंदन सोहळा’ या माध्यमातून मानवंदना देण्यात आली. ’तारक मेहता का उल्टा चष्मा’ चे निर्माता दिग्दर्शक असीतकुमार मोदी, याच लोकप्रिय मालिकेत जेठालाल चंपकलाल गडा ची अविस्मरणीय भूमिका साकारणारे ख्यातनाम अभिनेते दिलीप जोशी, गुजराती चित्रपट स्रुष्टीतील लोकप्रिय अभिनेते सिद्धार्थभाई रांदेरिया, ज्येष्ठ पत्रकार कुंदनभाई व्यास हे या सोहोळ्यात प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.

प्रत्येकाने हेमराज शाह यांच्या कारकीर्दिचा मुक्तकंठाने गौरव केला. तसेच दीर्घायुरारोग्यासाठी शुभेच्छा दिल्या. हेमराज शाह यांनी कृतज्ञता व्यक्त करतांना आपल्या आजवरच्या कार्याचे सिंहावलोकन केले. हितेन आनंदपरा, प्रवीण सोलंकी, उदय शाह, अरविंद शाह, नागजीभाई रीटा, राजेश दोशी, डॉ. हिराचंद दंडे, महेंद्र शाह, भरतभाई  घेलाणी, मुकेश जोशी, चिमन मोता, प्रिया तुरखिया, महेश गांधी आदी मान्यवर उपस्थित होते. समाजातर्फे डॉ. हेमराज शाह यांचा सन्मानपत्र, शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन विशेष गौरव करण्यात आला.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!