मुक्ताईनगर वासीयांना होतोय दूषित पाणी पुरवठा प्रहारचे डॉ.विवेक सोनवणे यांची तक्रार….

मुक्ताईनगर (जळगाव) :-दूषित पाणीपुरवठया बाबत प्रहारचे सोनवणे यांनी नगरपंचायत कार्यालयाला निवेदन सादर केले आहे त्यात म्हटले आहे की
वरील विषयाच्या अनुषंगाने तक्रार अर्ज सादर करतो कि सन २०१७ अखेर ग्रामपंचायतचे रुपांतर नगरपंचायतीत झाले. ग्रामपंचायत अस्तित्वात असतांना भारत निर्माण योजने अंतर्गत वाटर फिल्टर प्लांट चे काम पूर्ण / अपूर्ण अवस्थेत झाले तात्कालीन ग्रामपंचायत चे कर्मचारी / अधिकारी हे सर्व नगरपंचायत चे कर्मचारी म्हणून संबोधण्यात आले. नगरपंचायत विभागातील विभाग निहाय विभाग प्रमुख लाभणे अत्यंत महत्वाचे व जरुरीचे आहे यातील पाणी पुरवठा विभाग हा अत्यंत महत्वाचा व जिव्हाळ्याचा विभाग असून लोकांना दररोज मुलभूत गरज म्हणून पाणी पुरवठा करणे व पाणी स्वच्छ दर्जाचे कसे लाभेल यावर संबंधित विभागाने प्राथमिकता देणे गरजेचे आहे.परंतु तात्कालीन ग्रामपंचायत पासून ते नगरपंचायत पर्यंत शुद्ध व स्वच्छ पाणी पुरवण्यास सदरची न.पा. असमर्थ असून अपयशी ठरलेली आहे.

येथे लोकांना दुषित पाणी पुरवठा करून जीवाशी खेळ सुरु आहे. विशेष संतापजनक बाब म्हणजे मुक्ताईनगर शहरास पाणीपुरवठा करण्यासाठी वापरण्यात येणारी पाण्याची टाकी ही जवळपास ६० ते ७० वर्षी जुनी असून अत्यंत जीर्णावस्थेत आहे या टाकीवरील स्लब सुद्धा जीर्ण होवून ठिसुळ होवून पडत आहे व या उघड्या टाकीमध्ये बऱ्याच वेळेस भटके जनावर पडून मेलेले आहेत व तेच दुषित पाणी शहरातील जनतेस पिण्यास दिले जात आहे व अश्या दुषित पाण्यामुळे शहरातील जनतेस पोटाच्या विकारांना सामोरे जावे लागत आहे. अश्या जीवघेण्या भयावह परिस्थिती मध्ये नाईलाजास्तव शहरातील जनतेस बाराही महिने
आर ओ चे (क्षारयुक्त ) पाणी पिण्यासाठी बाहेरून विकत घेऊन प्यावे लागत आहे.कोरांना काळ असताना हाताला काम नाही पोटाला भाकर नाही व अशा विदारक परिस्थितीमध्ये मुक्ताईनगर शहरातील जनतेस पाणी विकत घेऊन प्यावी लागत आहे ही प्रशासनाला काळीमा फासणारी बाब आहे व याला जबाबदार मुक्ताईनगर नगरपंचायत प्रशासनाचा भोंगळ कारभार .

ठराविक काळ कामकाजात तात्पुरत्या स्वरुपाची सुधारणा होते नंतर पाणी पुरवठा नेहमी प्रमाणे दुषित यावर न.पा. कडून कायमचा तोडगा नाहीच. म्हणून जोपर्यत मुक्ताईनगर शहरातील जनतेस नगरपंचायत मार्फत स्वच्छ व शुद्ध पाणीपुरवठा होत नाही तोपर्यंत पाणीपट्टी घेण्यात येऊ नये . तात्कालीन ग्रामपंचायत चे रुपांतर न.पा. मध्ये होवून ४ वर्षे उलटून संबंधित कर्मचाऱ्यांचे न.पा. मध्ये समावेशन नाही याकडे वरिष्ठांचा सुद्धा कानाडोळा का? तर आज रोजी पाणी पुरवठा होणे कामी उपलब्ध असलेले साधन व संसाधन अपुरे, तोकडे स्वरूपाचे असून जीर्णावस्थेत आहे. न.प. मध्ये विभाग निहाय विभाग प्रमुखांचे दालन स्वतंत्र रित्या असणे गरजेचेआहे व कर्मचारी सुद्धा प्रशिक्षित असायला हवे परंतु विशेष खेदाची बाब म्हणजे न.पा. अमला आल्यापासून सदरहून कर्मचाऱ्यांना कोणत्याच प्रकारचे प्रशिक्षण देण्यात आलेले नाही. तरीही वरिष्ठ पातळीवरून पाणी पुरवठा विभागाची खाते चौकशी करून त्यात पूर्णता व
अपूर्णता काय यात तफावत आढळल्यास कारभार पारदर्शक कसा होईल यावर भर देऊन दैनंदिन कामकाजात सुसूत्रता येणे गरजेचे असून काळाची व वेळेची गरज आहे तसेच नव्याने अमलात आलेल्या न.प. ला प्राधान्य क्रमाने सामावून घ्यावे व भरीव निधीची तरतूद करून गोर गरीब जनतेला न्याय देण्याचे कार्य आपल्याच स्तरावरून व्हावे व पाणीपुरवठा अत्यंत महत्वाचा व जिव्हाळ्याचा विषय असून सातत्याने होणारा पाणीपुरवठा हा अत्यंत दुषित असून यातील सर्व दोष व अडथळे दूर करून मुक्ताईनगर शहरास स्वच्छ व शुद्ध पाणी कसे मिळणार याकामी बाहेरील तज्ञ वरिष्ठांकडून पाहणी करून यातील सर्व अडथळे दूर करण्यात यावे अथवा विभाग स्थरावरून या संपूर्ण बाबीसाठी विशेष बैठक मुक्ताईनगर या ठिकाणी घण्यात यावी व मुक्ताईनगर शहरास सुरळीत स्वच्छ व शुद्ध पाणी मिळावे या संदर्भात प्रहारचे डॉ. विवेक यांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री श्री. उद्धव ठाकरे, पाणीपुरवठा मंत्री तथा जळगावचे पालकमंत्री ना.गुलाबराव पाटील, राज्यमंत्री ना.बच्चू कडू, विभागीय आयुक्त नाशिक यांना देण्यात आले.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!