तळोदा-विश्व हिंदू परिषद- बजरंग दल तर्फे कारगिल विजय दिवस उत्सव साजरा…

दैनिक महाराष्ट्र सारथी तळोदा प्रतिनिधी उमेश सोनवणे यांचे कडुन ..

नंदुरबार जिल्ह्यातील तळोदा येथे दिनांक 26-07-2021 सोमवार रोजी
विश्व हिंदू परिषद बजरंग दल तळोदा तर्फे कारगिल विजय दिवस उत्सव साजरा केला. तळोदा येथील बालाजी वाडा येथे कारगिल विजय दिवस साजरा करण्यात आला या कार्यक्रमाला प्रास्ताविक प्रा.राजाराम राणे सर तळोदा प्रखंड अध्यक्ष यांनी केले. विश्व हिंदू परिषद जिल्हा मंत्री श्री.विजयराव सोनवणे यांनी कारगिल विजय दिवस विषयी मांडणी केली. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे व्यापारी असोसिएशन अध्यक्ष श्री.सुभाष जैन कार्यक्रमाचे अध्यक्ष ज्येष्ठ नागरिक संघ अध्यक्ष श्री.पिंपरी सर होते. या कार्यक्रमात माजी सैनिक यांचा सत्कार करण्यात आला. माजी सैनिक श्री.रूपसिंग पाडवी यांचा सत्कार श्री.सुभाष जैन यांनी केला माजी सैनिक श्री.रमेश पिंपरे यांच्या सत्कार श्री.पिंपळे सर यांनी केला. माजी सैनिक श्री.गोरख कलाल यांच्या सत्कार जिल्हा मंत्री श्री.विजयराव सोनवणे यांनी केला. माजी सैनिक श्री.राजेंद्र शेंडे यांचा सत्कार प्रा.राजाराम राणे सर यांनी केला. माजी सैनिक श्री.उदय सूर्यवंशी यांचा सत्कार श्री.महेश टोपले यांनी केला
.

कार्यक्रमाचे आभार प्रखंड मंत्री श्री.दीपक नाना चौधरी यांनी केले
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रखंड कार्याध्यक्ष डॉ. शांतीलाल पिंपरी,शहराध्यक्ष श्री.मुकेश जैन,शहर मंत्री श्री.पवन शेलकर, श्री.मुकेश सूर्यवंशी,चि.पवन सोनवणे यांनी केलं
.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!