महाविद्यालये सुरू करण्याच्या संदर्भातील निर्णय दोन दिवसांत होणार, उदय सामंत यांची माहिती

मुंबई,

पुण्यातील कॉलेजेस आजपासून सुरू करण्याचं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जाहीर केलं. त्यानुसार आज विद्यार्थी महाविद्यालयाबाहेर पोहोचले सुद्धा मात्र, असे असताना पुण्यातील महाविद्यालयांना या संदर्भात अधिकृत पत्रक प्राप्त न झाल्याने महाविद्यालये सुरू झाली की नाही या बाबत संभ-म निर्माण झाला. याबाबत आता उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांची प्रतिक्रिया आली आहे.

राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी म्हटलं, पुण्यातील एक-दोन महाविद्यालयात संभ-म झाला आहे. पालकमंत्री अजित पवार यांनी कोरोना आढावा बैठकीबाबत बैठक घेतल्यावर पुण्यातील महाविद्यालये सुरू करण्याचं म्हटलं होतं. उद्या या संदर्भात सर्व कुलगुरूंसोबत चर्चा करुन मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांसोबत बोलणार आहे. त्यानंतर उद्या किंवा परवा महाविद्यालये सुरू करण्याच्या संदर्भात निर्णय जाहीर करण्यात येईल.

कोरोनाची स्थिती आटोक्यात आली आहे. संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेऊन महाविद्यालये सुरू करण्यात येतील. या संदर्भातील गाईडलाईन्स, अभ्यासक्रम कसा असेल याबाबत सविस्तर माहिती येत्या दोन दिवसांत जाहीर करण्यात येईल. महाविद्यालये सुरू करायची आहेत मात्र, घाई करुन चालणार नाही असंही उदय सामंत यांनी म्हटलं आहे.

कोरोनाची लाट ओसरल्यामुळे सर्व बाजारपेठा, शॉपिंग मॉल, मंदिरं उघडण्यात आली आहे. शाळा सुद्धा 4 ऑॅक्टोबरपासून सुरू झाल्या आहेत. त्यानंतर आता महाविद्यालयं सुरू करण्याची घोषणा लवकरच करण्यात येणार आहे.

तीन दिवसांपूर्वी जालन्यात पत्रकारांशी बोलत असताना राजेश टोपे यांनी राज्यातील कोरोनाची परिस्थिती, लसीकरणाबाबत माहिती दिली. ’टास्क फोर्सने सांगितल्याप्रमाणे ऑॅक्टोबरनंतर किंवा दिवाळीनंतर तिसरी लाट आली तरी ती जास्त प्रभावी ठरणार नाही,त्याचा मोठा परीणाम होणार नाही. असं अधिकार्‍यांशी केलेल्या चर्चेनंतर लक्षात आलं आहे. अमेरिका, युरोपमध्ये कोरोनाची तिसरी लाट आली पण तिचा प्रभाव जास्त दिसून आला नाही. मात्र लसीकरणामुळे कोरोनाची दाहकता कमी करता येऊ शकते, असंही ते म्हणाले.

’परभणी जिल्ह्यात एका विद्यार्थ्याला कोरोनाची लागण झाल्यानं शाळा 10 दिवस बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या संदर्भात शालेय शिक्षण विभागाला आरोग्य विभागाने काही सूचना केल्या असून आणखी अशी घटना घडल्यास शालेय शिक्षण आणि विभाग त्या सूचनेनुसार निर्णय घेईल, असंही टोपे म्हणाले.

’नाशिक आणि अहमदनगर जिल्ह्यात कोरोना रूग्णसंख्या वाढत असली तरी तिथे काळजी करण्याची गरज नाही. तिथे लसीकरण वाढवण्यासोबतच कोरोना टेस्टिंग वाढवण्याच्या सूचना देण्यात आल्याचंही टोपे यांनी सांगितलं.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!