महागाईमध्ये सामान्यांना अंशत: दिलासा; पेट्रोल-डिझेलच्या किंमती 15 पैशांनी स्वस्त

नवी दिल्ली प्रतिनिधी,

एकीकडे खाद्य तेल आणि डाळीच्या किंमतीमध्ये वाढ होत असताना पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती 15 पैशांनी उतरल्या आहेत. मुंबईत पेट्रोलची किंमत 107. 52 रुपये प्रति लिटर आहे, तर डिझेलची किंमत 96.48 रुपये प्रति लिटर आहे. तर देशाच्या राजधानीत पेट्रोलची किंमत 101.49 रुपये प्रति लिटर, तर डिझेलची किंमत 88.92 रुपये प्रति लिटर आहे.

आजचे इंधनाचे दर

शहरं पेट्रोलची किंमत डिझेलची किंमत

दिल्ली 101.49 88.92

मुंबई 107.52 96.48

चेन्नई 99.20 93.52

कोलकाता 101.82 91.98

जुलै महिन्यातील वाढ

जुलै महिन्यात आतापर्यंत पेट्रोलच्या किमती 9 वेळा आणि डिझेलच्या किमतींमध्ये 5 वेळा वाढ झाली आहे. तसेच जुलै महिन्यात एका दिवशी डिझेलच्या किमतीत काही प्रमाणात घट झाल्याचं पाहायला मिळालं होतं. यापूर्वी मे आणि जून महिन्यात इंधनाच्या किमतींमध्ये 16-16 वेळा वाढ झाली होती. 4 मेनंतर आतापर्यंत राजधानी दिल्लीमध्ये पेट्रोलचे दर 11.44 रुपये प्रति लिटर आणि डिझेलचे दर 09.14 रुपये प्रति लिटर महाग झालं आहे.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!